Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute:नातेपुते पोलीस ठाण्यात 50% मनुष्यबळावर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे नूतन पोलीस अधिकारी परजने यांच्यापुढे आव्हान


महादरबार न्यूज नेटवर्क -   
सोलापूर जिल्ह्याच्या सर हाद्दीवर   व दोन जिल्ह्याच्या सीमालगत असणाऱ्या नातेपुते शहरासह परिसरातील 31 गावांसाठी नातेपुते पोलीस स्टेशनला कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 100 (पोलीस व दोन पोलीस अधिकारी 2+100) पोलीस मनुष्यबळाची मंजुरी असताना सध्या  45 पोलीस मनुष्यबळावर असल्याने म्हणजे 50 टक्के पेक्षा कमी पोलीस मनुष्यबळावर कायद्यावर सुव्यवस्था राखण्याचे आव्हान नुकतेच नवीन पदभार घेतलेले नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांच्यापुढे असून दोन महामार्ग जाणारे नातेपुते शहर व परिसरातील 31 गावे असणाऱ्या या परिसरासाठी
नातेपुते मध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे पोलिसांसमोर आव्हान

नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून महारुद्र परजणे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे सध्या नातेपुते शहरातील तसेच ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे  आव्हान नूतन पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांच्यासमोर आहे .

नातेपुते पोलिस स्टेशन येथे ४५कर्मचारि कार्यरत आहेत,त्यामधे डी.वाय.एस.पी .आॅफीस येथे५कर्मचारी,उपोषण,आंदोलन,रास्तारोको यासाठी तीन ,चार कर्मचारी,मंञी आमदार दौर्यासाठी काही कर्मचारी ,नातेपुते हद्दीत ३१गांवे असून ३५पोलिसावर कारभार चालू असल्याचे समजते.

काही दिवसापूर्वीच नातेपुते पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाढलेल्या चोऱ्या, अवैध धंदे बंद  करणे, शाळा कॉलेज परिसरात टपोरी मुलांचा बंदोबस्त करणे, याबाबत नागरिकांच्या अपेक्षा  आहेत नातेपुते सपोनी म्हणून नुकतेच महारुद्र परजणे यांनी पदभार स्वीकारला आहे. नातेपुते सोलापूर जिल्ह्यात महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते तीन जिल्ह्याच्या सरहद्दीवर वर वसलेले शहर असून शहरातून पालखी मार्ग, शिखर शिंगणापूर यात्रा, कारुंडे यात्रा , वाहतुकीचे प्रमाण ही वाढलेले आहे ,चोरीचे प्रमाण वाढल्याने गावागावात सीसीटीव्ही बसवणे गरजेचे आहे.लोकाभिमुख पोलिसिंग करणार
सपोनी महारूद्र परजणे 


पोलिस स्टेशनअंतर्गत
येणाऱ्या ३१ गावांमध्ये भेटी देऊन तेथील माहिती घेत कामाची सुरुवात करण्यात येईल. त्या भागांमध्ये नागरिकांशी थेट संवाद साधून लोकाभिमुख आणि स्मार्ट पोलिसिंग करणार असल्याचे नातेपुते पोलिस स्टेशनचे सपोनी महारूद्र परजणे  यांनी सांगितले. यापूर्वीचे सपोनी प्रविण सपांगेयांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीव पूणे ग्रामीणला बदली झाली आहे. 
महारूद्र परजणे  यांनी चंद्रपूर येथे कार्यरत असताना नक्षली भागात विशेष कामगिरी बजावली आहे.स्मार्ट पोलिसिंग करण्यासह गुन्हेगारी कमी करून महिलांविषयक गुन्हे घडणार नाहीत, याची काळजी आपण आपल्या कार्यकाळात घेऊ, अशी ग्वाही परजणे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments