Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun:पेन्शन योजनांच्या रकमेत वाढ करावी; आमदार शेखर निकम यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
अपंग, विधवा, श्रावण बाळ, राष्ट्रीय कुटुंब योजना आदी योजनांतील लाभार्थ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करून अटींमध्ये बदल करण्यात यावेत, असे पत्र आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.

आ. निकम यांनी दिलेल्या पत्रानुसार, राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी शासनातर्फे विविध योजना राबविल्या जात आहेत. या माध्यमातून लाभार्थ्यांना दिली जाणारी पेन्शन ही सध्या वाढणाऱ्या महागाईच्या काळात अत्यल्प आहे. या अल्प पेन्शनद्वारे स्वतःचा उदरनिर्वाह करणे कठीण होत आहे. त्यातून अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

त्यामुळे पेन्शनमध्ये वाढ व अटींमध्ये बदल करण्यात यावेत. त्यानुसार वय पूर्ण असणारे लाभार्थी व ज्यांना अपत्य नाहीत अशांना पेन्शन मंजूर करण्यात यावी. संजय गांधी निराधार अनुदान योजनेत बसणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना चार हजार रूपये पेन्शन द्यावी. श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना पाच हजार रूपये मंजूर व्हावेत, राज्यातील अपंगांना सरसकट विनाअट घरकूल मंजूर करावे, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेत बसणाऱ्या विधवांना ५० हजार रूपये मंजूर करण्यात यावेत व दारिद्यरेषेची अट रद्द करावी; संजय गांधी, श्रावण बाळ, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्नाची अट बदलून ७५ हजार रूपये करण्यात यावी असे आ. निकम यांनी पत्रात नमूद केले आहे.

Post a Comment

0 Comments