#Natepute:मुला- मुलींना घडवण्याची ताकद आईच्या हातात - राजकुमार हिवरकर पाटील


महादरबार न्यूज नेटवर्क -
तुमच्या घरी मुलगा जन्माला आला तर तो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असला पाहिजे आणि मुलगी जन्माला आली तर ती झाशीच्या राणीसारखी झाली पाहिजे आणि हे सर्व घडविण्याचे त्या मुला मुलींच्या कर्तबगार आईच्या हातात असते असे विचार राजकुमार हिवरकर पाटील  शिवसेना नेते यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र फोंडशिरस या ठिकाणी मांडले.

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त माळशिरस तालुका शिवसेनेच्या वतीने आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब व जिल्ह्याचे संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्य सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये गरोदर मातांसाठी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम त्याचबरोबर स्तनदा माता तपासणी, रक्तगट तपासणी, बीपी तपासणी,शुगर तपासणी अशा विविध प्रकारच्या तपासण्याचे शिबिर सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आले याप्रसंगी बोलताना राजकुमार हिवरकर पाटील म्हणाले सरकारी योजना ही सरकारी न राहता ती सामान्य च्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब व कार्यसम्राट आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत साहेब यांचे आरोग्य विषयीचे स्वप्न  शिवसेनेचे नेते तथा सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा शिवाजीराव सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली साकार होणार आहे .

यामध्ये गरोदर मातांसाठी कोणता आहार आवश्यक आहे त्याची गरज किती महत्त्वाची आहे त्याचबरोबर आहार जर व्यवस्थित नसला मातेचा आहार जर व्यवस्थित नसेल तर बाळ सदृढ जन्माला येणार नाही, येत नाही वेळ प्रसंगी बाळाला जन्मताच काचेमध्ये ठेवावे लागते. त्यामुळे कुटुंबाला नाहक आर्थिक जोखीम
सहन करावी लागते हे प्रत्येकाच्या घरामध्ये घडतं हे सगळ्यांना माहिती आहे परंतु याकडे आपण पद्धतशीरपणे गांभीर्याने बघत नाही विचार करत नाही त्यासाठी आज शिवसेनेच्या वतीने संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माळशिरस तालुक्यात आरोग्य सप्ताह साजरा करण्यात येणार आहे राष्ट्रमाता जिजाऊंनी स्वतःच आरोग्य व्यवस्थित ठेवत एक मुलगा युद्धामध्ये कटकारस्थानाने मारला गेला तरी सुद्धा दुसरा मुलगा हा समाजासाठी हिंदवी स्वराज्याचे राज्य निर्माण करण्यासाठी समाजासाठी सुसंस्कृत विचारांकचा युगपुरुष निर्माण केला त्यामुळे तुमच आमच हिंदुत्व अबाधित राहिले हाच आदर्श माता भगिनींनी आपल्या डोळ्यासमोर आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी ठेवला पाहिजे मुलगा झाला तर छत्रपती शिवरायांसारखा झाला पाहिजे आणि मुलगी झाली तर झाशीच्या राणीसारखी झाली पाहिजे जिजाऊ सावित्री लेक म्हणून त्यांच्या विचाराचा वारसा चालवला पाहिजे असे मत यावेळी बोलताना शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी व्यक्त केले .

त्यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. एम पी मोरे,  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.रामचंद्र मोहिते, नातेपुते शहर प्रमुख पोपटराव शिंदे , फोंडशिरस गावचे सरपंच पोपटराव बोराटे, दहिगाव गावच्या सरपंच सोनम ताई खिलारे, जिल्हा परिषद सदस्य भानदास पाटील, पंचायत समिती सदस्य मधुकर पाटील, भाजपचे मनोज जाधव, भाजपचे तेजस गोरे, तालुका मीडिया प्रमुख सुनील बनकर, तालुका उपप्रमुख प्रमोद चिकणे,
दहिगाव चे शाखाप्रमुख विजय सरवदे, अलंकपुरी चे शाखाप्रमुख विजय ढेकळे, पिरळे शाखाप्रमुख आकाश खिलारे, सनी बरडकर, दत्ता बोडरे, मेजर दादा केंगार आदी मान्यवर उपस्थित होते. फोंडशिरस प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व डॉक्टर सिस्टर कर्मचारी वृंद ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी माझी वैद्यकीय अधिकारी डॉ.एम पी मोरे, दहीगाव गावच्या सरपंच सोनम ताई खिलारे यांनी मनोगत व्यक्त केलं प्रास्ताविक विजया चव्हाण आरोग्य सहाय्यक यांनी केलं.  सूत्रसंचालन विठ्ठल सूर्यवंशी सर यांनी केलं.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम