#Natepute:प्रमोद शिंदे यांच्या लढ्याला अखेर यश स्मशानभूमी साठी नऊ लाख रुपये चा निधी मंजूर


महादरबार न्यूज नेटवर्क -
पिरळे येथे स्मशानभूमी व्हावी म्हणून एन.डी.एम.जे राज्य प्रसिद्धी प्रमुख  पत्रकार प्रमोद शिंदे यांनी गेली दोन वर्ष स्मशान   भूमीसाठी आंदोलन च्या  माध्यमातून लढा उभा केले होते अखेर या लढ्याला यश मिळाले आहे. प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेत स्मशानभूमी साठी पिरळे येथे नऊ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होऊन देखील आतापर्यंत या गावामध्ये स्मशान भूमी नव्हती.गावामध्ये दलित व इतर मागासवर्गीय वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो. त्यांना स्वतःची शेत जमीन,जागा नसल्यामुळे अंत्यविधी करण्यास खूप मोठी अडचण निर्माण होत होती.यावर प्रमोद शिंदे यांनी माळशिरस तहसील कार्यालया समोर दोन वेळा धरणे आंदोलन केले होते.

तसेच मा. जिल्हाधिकारी,कार्यकरी , व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन सततचा पाठपुरावा केला होता. .तसेच माजी सरपंच संदीप नारोळे यांनी देखील पाठपुरावा केला होता.ग्रामसेवक हनुमंत वगैरे यांनी अंदाजे एक कोटी वीस लाख रुपये चे स्मशानभूमी इस्टिमेट शासनास सादर केले होते.सादर निधी जिल्हा वार्षिक योजना 23-2024
अंतर्गत ग्रामपंचायत जन सुविधा पुरवणे योजनेतून करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात नऊ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. जन सुविधातून अगोदर सहा लाख रुपये व नंतर नऊ लाख रुपये निधी मंजूर आला असून.स्मशान भूमी साठी साध्य 15 लाख रुपांपर्यंतचा निधी आला आहे. यातून टप्प्या टप्प्याने. दहन शेड, कंपाऊड, स्मशानभूमी अंतर्गत पोहच रस्ता, स्मशान भूमीत पाणी सुविधा, विद्युतीकरण, सुशोभीकरण, इत्यादी कामे टप्प्या टप्प्याने होणारअसून.स्मशान भूमी मुळे जन सामान्याचे गैरसोय होणार नाही.सदर काम एका महिन्याच्या आत करण्याच्या आदेश उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन सेळकंदे यांनी दिले आहेत.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम