#Yavat:अडचणीच्या विकास कामासाठी शासनाकडून दरवर्षी किमान एक लाख रुपये निधी मिळावा - नवनिर्वाचित सरपंच साधना जगदाळे


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
शासनाने जसा खासदार आमदार, जि. प आणी प.स. यांना त्यांच्या मतदार संघातील विकास कामासाठी विशेष निधी देण्यात येतो.त्याचं न्यायाने गाव पातळीवर अडचणीच्या आणी अचानक कामासाठी दरवर्षी एक लाख रुपये देण्यात यावा अशी मागणी भरतगाव येथील नवनिर्वाचित सरपंच साधना विलास जगदाळे यांनी आपल्या सत्कार प्रसंगी पत्रकार यांचेशी बोलताना केली आहे.

दौंड तालुक्यातील भरतगाव येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी साधना विलास जगदाळे यांची निवड झाल्याचे  निवडणूक निर्णय अधिकारी तथा महसूल मंडळ अधिकारी  प्रकाश भोंडवे यांनी जाहीर केले आहे. सरपंच निवडणूक कमी गावकामगार तलाठी  गौरी देशपांडे आणी ग्रामसेवक विजय भांडारी यांनी सहकार्य केले आहे.

यावेळी नवनिर्वाचित सरपंच यांना आपल्या गाव विकास संकल्पना बाबत साधना ताई म्हणाल्या, आमचे गाव लहान,कमी उत्पन्न आणी दर्गम व डोंगरी भागात आहे. गावात अडचणी प्रसंगी अथवा अचानक काम निघाल्यास त्यासाठी कोणताही राखीव निधी नसतो. मग काम करायचे कसे.शासकीय प्रोसिजर प्रमाणे कामाचा प्रस्ताव पाठवून काम मंजूर होने, त्यावर निधी मिळणार ,काम सुरु होने यामध्ये एक वर्ष निघून जाते,याचा मी सदस्य म्हणून अनुभव घेतला आहे. दरवर्षी गावच्या हिताचे एखादे काम करायचे म्हटले तरी तळमळ असूनही करता येत नाही.सरपंच सांगूनही काम लांबवतात गैर समज होतो.
यासाठी सरपंच यांनाही गावाच्या लहान मोठ्या तत्काल अडचणीच्या विकास कामासाठी शासनाने दरवर्षी किमान एक लाख रुपये निधी मंजूर करण्यात यावा.

यावेळी ग्रामस्थ आणी कार्यकर्ते यांचेवतीने नवनिर्वाचित सरपंच याचा सत्कार करण्यात आला.
प्रसंगी ए म. जी. शेलार.,सहजपूरचे उप् सरपंच सीताराम वेताळ,तंटामुक्ती अध्यक्ष महेश म्हेत्रे , विलास जगदाळे, उत्तम टेमगिरे ,प्रकाश टेमगिरे, उपसरपंच अजित जगदाळे, मारुती हाके,पपू हाके यांनी मनोगते व्यक्त केली. या वेळी गावातील विविध सस्थांचे चेअरमन, संचालक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, प्रमुख कार्यकर्ते , ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम