#Natepute:१४फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे साजरा न करता मातृ पितृ सोहळा दिवस साजरा करा - धैर्यशील देशमुख


महादरबार न्यूज नेटवर्क -
आजच्या काळात मुलांवर चांगल्या संस्काराची खूप गरज आहे पालकांनी मोबाईलचा कामापुरताच वापर केला पाहिजे पालकांनी मोबाईल दूर ठेवण्याचा संयम ठेवून मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे. आज एका कोपऱ्यात वडील एका कोपऱ्यात आई एका कोपऱ्यात मुले मोबाईल घेऊन बसतात. त्यामुळे घराघरातला संवाद तुटत चालला आहे. काही ठिकाणी तर आई-वडिलांनी आपल्या मुलाला काम करून शेती विकून शिकवले आणि मुलगा चांगल्या नोकरीला लागल्यानंतर वडील भेटायला आल्यानंतर माझे वडील नसून हे सालगडी असल्याचे सांगितले जाते. यासाठी लहानपणापासूनच मुलांवर चांगले संस्काराची गरज असून मुलांनी आई-वडिलांना सांभाळले पाहिजे मुलांनीही इथून पुढे लक्षात ठेवले पाहिजे १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे  आपल्या जीवनातून काढून टाका हा दिवस मातृ पितृ जनसोहळा दिवस म्हणून साजरा करा आहे. आई-वडिलांचा वाढदिवस साजरा करा .आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करा, यामुळे आपल्याला ज्यांनी जग दाखवले आहे त्या मातापित्यांना आनंद वाटेल धन्यता वाटेल आणि आपल्या आई-वडिलांचे रोज दर्शन घेत जावा. असे प्रतिपादन नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धैर्यशील देशमूख यांनी केले.ते  दाते प्रशालेत १४ फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांकडून मातृ-पितृ पूजन सोहळा कार्यक्रमात प्रस्तावित करताना बोलत होते , प्रारंंभी विद्येची देवता सरस्वतीचे  प्रतिमापूजन करण्यात आले,तसेच मूलांनी आपल्या आई वडीलांचे पूजन करून दर्शन घेतले,यावेळी अनेक पालकांच्या डोळ्यांत आनंदाअश्रू तरळले,अनेक पालक आपल्या मूलांकडे कौतूकांने पहात होते.

या.कार्यक्रमासाठी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे,  डॉ.एम. पी. मोरे ,चेअरमन धैर्यशील देशमूख,व्हा. चेअरमन संतोष काळे ,सेक्रेटरी महेश शेटे,अॅड. शिवाजीराव पिसाळ, नंदन दाते, नंदू लांडगे,मूख्याध्यापक विठ्ठल पिसे, आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पालक ,विद्यार्थी शिक्षक,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी तुकाराम महाराज उराडे, सतीश बर्गे ,तसेच वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे सूञसंचालन दडस यांनी, आभार व्हा. चेअरमन संतोष काळे यांनी मानले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत