#Natepute:शिंगणापूर ते कळंबोली रस्त्याच्या साईडपट्टीची झाली दुरवस्था
महादरबार न्यूज नेटवर्क -
नुकताच कळंबोली, नातेपुते,शिखर शिंगणापूर रस्त्याचे लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.रस्त्याच्या कडेला असणाऱ्या साईडपट्टीचे काम आठ दिवस झाले पुर्ण झाले आहे.परंतु सदरचे साईडपट्टीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व खराब पध्दतीचे काम ठेकेदार यांनी केले आहे.पेव्हर ब्लाॕक जे टाकलेले आहेत ते पण व्यवस्थीत लाईन दोरीमध्ये न लावल्यामुळे ते निघण्याच्या मार्गावर आहेत वरुन नुसती मातीची फक्की टाकण्याचे काम केले आहे.
या मार्गावरुन शिखर शिंगणापुर,. कोल्हापुर,जोतीबा,गोंदवले,सांगली या ठिकाणी या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते,यामार्गावर गर्दी होत असून. या मार्गावरील साईडचा मुरुम लेवलमध्ये न टाकल्यामुळे तो रस्त्यावर इतरत्र पसरल्यामुळे गाड्या स्लीप होतात.बांधकाम विभागाचे अधिकारी या कामाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत .सदरच्या कामाचा मलिदा खाण्यात अधिकारी व्यस्थ आहेत.ठेकेदार,अधिकारी ,तूपाशी तर सर्वसामान्य नागरिक उपाशी अशी परिस्थिती झाल्याचे नागरिक बोलत आहेत.सदरचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने ते काम नव्याने दुरुस्त करावे व संबंधित ठेकेदार,अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी.अशी मागणी नागरिकांनमधून होताना दिसत आहे.
Comments
Post a Comment