#Baramati मायावतींचा बसपा करणार "सोशल इंजिनीअरिंग" बारामतीत कोणाचे गणित बिघडवणार?
धनगर समाजाला उमेदवारी देणार!
महादरबार न्यूज नेटवर्क -
बारामती लोकसभा मतदार संघात यावेळी पवार घराण्यात दुफळी निर्माण झाली आहे, त्यामुळे काका, पुतण्याचा संघर्ष महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाला आहे, अगदी खालच्या पातळीवर दोन्ही कडून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, नेते टीका एकमेकांवर करीत आहेत, हा संघर्ष पहिल्यांदाच पवार घराण्यात पाहायला मिळतोय दुसरीकडे संपूर्ण देशात भाजपची सत्ता असताना बारामतीत मात्र भाजप शांत आहे , भाजप लांबून या सर्व परिस्थितीकडे बघत आहे.

Advertisement
त्यामुळे बारामतीत पहिल्यांदाच पवारांच्या होम पिचवर चुरस निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे ओबीसी समाज देखील आपली ताकत दाखवण्याच्या तयारीत आहे, ओबीसी, बहुजन समाजाचा मतदार बारामती लोकसभेत मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामध्ये धनगर समाजाचे मोठे निर्णायक मतदान या मतदार संघात आहे.
धनगर समाजाचे महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळेना टफ फाईट दिली होती. तब्बल चार लाख 4.51 हजार मते त्यावेळी त्यांना मिळाली होती हे देखील महत्वाचे आहे, त्यातच आता देशात सोशल इंजिनीअरिंग करण्यात माहीर असलेल्या" मायावतीं" नी देखील बारामती लोकसभा मतदार संघात लक्ष घातले आहे.

"बसपा"ने धनगर समाजाचा उमेदवार निश्चित केला असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे धनगर, ओबीसी चा देखील खासदार होऊ शकतो, धनगर समाजाचा उमेदवार दिला तर" बहुजन समाज पार्टी" गेम चेंजर ठरू शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे, बारामतीत धक्कादायक निकाल लागू शकतो अशी परिस्थिती सध्यातरी दिसत आहे.
Comments
Post a Comment