Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute तेजस्विनी मोरे -पांढरे यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार


महादरबार न्यूज नेटवर्क -
जि .प. प्रा .शाळा कारुंडे शाळेच्या पदवीधर शिक्षिका सौ तेजस्विनी शिवशंकर मोरे -पांढरे  यांना पंचायत समिती माळशिरस यांच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षिका पुरस्कार सन 2022-23 शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर श्री कादर शेख यांच्या हस्ते गटविकास अधिकारी विनायक गुळवे व गटशिक्षणाधिकारी प्रदीप करडे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

                          Advertisement 

 तसेच त्यांनी केलेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा विषयक मार्गदर्शन ,स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले.
लोंढे मोहिते वाडी, पाटील वस्ती ,लोंढे वस्ती व कारुंडे या  गावामध्ये त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून प्रगतशील विद्यार्थि घडविले आहेत. लोंढे वस्ती येथे  प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून  कामकाज पाहिले आहे. शाळेसाठी लोकसहभागातून   75000 रु. इतका  निधी शाळेसाठी उपलब्ध केला.. कोरोना काळात  ऑनलाइन  अध्यापन् केले.

इयत्ता आठवी NMMS परीक्षेत तीन विद्यार्थी सारथी शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत. तसेच त्या क्रीडा मार्गदर्शक आहेत. जिल्हास्तर व तालुका स्तरावर त्याच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले आहे. तसेच उल्लेखनीय कामगिरीबद्दल रत्नाई पुरस्कार मिळाला आहे.

Post a Comment

0 Comments