महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
सावर्डे येथे भव्य जिल्हास्तरीय नमन स्पर्धा, उद्घाटन आमदार शेखरजी निकम भैय्या शेठ सामंत , सांस्कृतिक विभाग प्रदेश उपाध्यक्ष अभिनेते दिग्दर्शक असित रेडीज,सचिन पाकळे, केतन पवार, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर, बक्षीस वितरण समारंभ
प्रथम क्रमांक हौशी कलाकार नमन मंडळ गोलवली, तालुका संगमेश्वर, द्वितीय क्रमांक रवळनाथ नमन मंडळ रत्नागिरी, तृतीय क्रमांक ए वन केदारनाथ नमन मंडळ सावर्डे भुवडवाडी.
तसेच वैयक्तिक पारितोषिके उत्कृष्ट गन उत्कृष्ट गवळण उत्कृष्ट वादन उत्कृष्ट गायन लक्षवेधी सादरीकरण उत्कृष्ट अभिनय... विजेत्या संघाला चित्रपट अभिनेते हास्य जत्रा फ्रेम प्रभाकर मोरे यांच्या हस्ते रोख रुपये पन्नास हजार बक्षीस व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
Advertisement
द्वितीय क्रमांकाचे बक्षीस रेडीज यांच्या हस्ते रोख रुपये पस्तीस हजार व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले, तृतीय क्रमांक विजेत्याला रोख रुपये २१००० व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले जिल्ह्यातील १४ नामवंत नमन संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री चंद्रकांत पालकर लांजा श्री शेखर मुळे रत्नागिरी श्री कुळे चिपळूण, श्री प्रदीप मोहिते चिपळूण यांनी काम पाहिले. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद रसिकांनी दिला. संपूर्ण स्पर्धेसाठी माननीय आमदार शेखरजी निकम यांनी मार्गदर्शन आणि सहकार्य केले. स्पर्धेसाठी राधा गोविंद फाउंडेशन आणि शिक्षक मित्र सामाजिक प्रतिष्ठान यांनी आयोजक म्हणून चांगले योगदान दिले..
भविष्यामध्ये लोककलावंतांना जे जे सहकार्य लागेल ते देण्याचे माननीय आमदार शेखरजी निकम यांनी आपल्या भाषणामध्ये केले. या स्पर्धेच्या निमित्ताने चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील निवडक लोककलावंतांना सह्याद्री कलारत्न पुरस्कार २०२४ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला त्यामध्ये चिपळूण मधून शाहीर शाहिद खेरटकर, श्री भिकाजी बुवा चौगुले , श्री रघुनाथ मिस्त्री, श्री गणपत डिके, श्री बाबू गुडेकर, श्री पांडुरंग कदम, श्री काशीराम जोगले, श्री नितीन बांडागळे यांना सह्याद्री कलारत्न पुरस्कार देण्यात याच व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांस्कृतिक चित्रपट व कला विभाग जिल्हा कार्यकारिणी पद नियुक्ती करण्यात आली. चिपळूण तालुक्यातून श्री प्रदीप मोहिते, श्री शाहिद खेरटकर, श्री अरविंद जोगळे, श्री भूषण वारे, तसेच संगमेश्वर तालुक्यातून महेंद्र नांदळजकर, नितीन बांडागळे, राजेश भेरें, संदेश बांडागळे किशोर चांदे यांना पद देण्यात आली.
0 Comments