#Natepute महा किड्सचा सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षिस वितरण संपन्न


महादरबार न्यूज नेटवर्क -
एस एम.पी  एजूकेशन सोसायटी नातेपुते संचलित महा किड्स सी.बी.एस. ई स्कूल फोंडशिरस चा सांस्कृतिक कार्यक्रम युवा नेते जीवनभैया उत्तमराव जानकर व मामासाहेब पांढरे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.

                       
                                 
                            Advertisement 
जीवन भैया जानकर यांनी पालकांना मार्गदर्शन करताना पालकांनी मुलांना मैदानी खेळ स्पर्धा परीक्षा  आणी मुलाना सकस आहार कसा देता येईल यावर भर द्यावा असे प्रतिपादन केले. एक चांगली सुद्रुढ पिढी घडवायची असेल तर मुलांचा शारीरिक, मानसिक आणी बौद्धीक विकास होने गरजेचे आहे. त्यासाठी  मुलांना मैदानी खेळ , योगा आणी बुद्धिबळ याचे  प्रशिक्षण गरजेचे आहे.  महा किड्स  ग्रामीण भागातील पालक आणी विद्यार्थ्यांना खेळ आणी सी.बी.एस, ई अभ्यासक्रमाची पर्वणीच देत आहे  त्याचा फायदा पालक आणी विद्यार्थ्यांनी घ्यावा असे सांगितले.

तसेच मामासाहेब पांढरे यांनी संस्थेने कोरोना काळातून उभारी घेत पालकांचा विश्वास जिकून पुन्हा उभारी घेतली आहे याचे कौतुक केले आणी बक्षिस मिळालेल्या चिमुकल्यांना शाबासकी दिली. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष अँड शिवशंकर पांढरे यांनी केले. कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन सौ.तेजस्विनी पांढरे, सौ.निशाताई सरगर, मेजर सुरेश पांढरे, संदीप कदम, डॉ. सतीश झंजे, श्री.अमोल शिंदे, श्री.सीताराम पांढरे तसेच अँड. रावसाहेब पांढरे आणी सौ.सुवर्णा वारे   उपस्थित होते.

नूतन संचालक मेजर सुरेश पांढरे यांच्या तर्फे सर्व क्रीडा प्रकारासाठी रोख स्वरूपात बक्षिसे देण्यात आली. तसेच विद्या प्रतिष्ठानचे इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. संजय खिलारे सर यांच्या तर्फे स्टुडन्ट ऑफ द इयर ची ट्रॉफी देण्यात आली.

महा किड्स स्टुडन्ट ऑफ द इयर मास्टर आरुष सुशील गांधी (इ.4 थी), बेस्ट स्टुडन्ट ऑफ द इयर मिस. आरोही सतीश झंजे (इ. 1 ली), मास्टर शिवम भीमराव ठोंबरे (यु.के.जी), अक्षता प्रशांत ढोपे (एल. के.जी), तसेच बेस्ट ग्रँड - पेरेंट्स ऑफ द इयर सौ.बेबिताई व श्री.धनाजी आद्रट, बेस्ट पेरेंट्स ऑफ द इयर  सौ.सीमा व श्री.संदीप कदम आणी सौ.किरण व श्री सुरेश भुजबळ  यांना देण्यात आला.  महा किड्स बेस्ट टीचर ऑफ द इयर मिस. गौरी लक्ष्मन ढोपे यांना देण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सोसियल मीडिया चे दुष्परिणाम, समाजिक, शेतकरी, शैक्षणिक, लोकगीते, शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी यांचा जीवनपट असे सुंदर कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ऍडमिन रागिणी जाधव, गौरी ढोपे, शुभांगी देशमुख, कोमल रणदिवे, ज्योती बंडगर, साक्षी कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन औदुंबर बुधावले पाटील यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत