#Natepute संतोष पवार आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित


महादरबार न्यूज नेटवर्क -
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कारुंडे ता.(माळशिरस) येथील विद्यार्थीप्रिय,  उपक्रमशील शिक्षक संतोष बापू पवार  यांना माळशिरस पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

                             Advertisement 


संतोष पवार यांनी जाणीवपूर्वक  कोथळे, फडतरी,कारुंडे यांसारख्या डोंगर पायथ्याशी असलेल्या शाळांमध्ये शैक्षणिक कार्य केले. विद्यार्थी हिताच्या अनेक योजना राबवल्या. ग्रामीण भागात त्यांनी आपल्या शैक्षणिक, सामाजिक,राष्ट्रीय कार्याचा ठसा उमटवला आहे.तसेच त्यांची स्कॉलरशिप मार्गदर्शक म्हणून ख्याती आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारुंडे ही स्वच्छ व सुंदर शाळेमध्ये सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये प्रथम क्रमांकाने आलेली आहे. तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्येही तालुकास्तरावरती प्रथम क्रमांकाचा व जिल्हा स्तरावरती द्वितीय क्रमांकाचा बहुमान या शाळेला मिळालेला आहे. माळशिरस तालुक्यामध्ये एक दर्जेदार प्राथमिक शाळा बनवण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे.

शंकरराव मोहिते पाटील स्मृती भवन अकलूज या ठिकाणी सोलापूर जिल्हा प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख, गटविकास अधिकारी विनायक गुळवे गटशिक्षणाधिकारी प्रदीप करडे यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांचे स्नेह, प्रेम ,आपुलकी मिळाल्यामुळेच शैक्षणिक कार्य अधिक गतीने करण्याची प्रेरणा  मिळत गेल्याचे त्यांनी सांगितले. कारुंडे शाळेचे मुख्याध्यापक नागनाथ शिंदे, सर्व शिक्षक व ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम