#Chiplun तांबेडी गावातील घराला मध्यरात्री शॉर्ट सर्किटमुळे आग; पावणे चार लाखाचे नुकसान

आमदार शेखर निकम यांनी भेट देवुन केली तातडीची मदत




महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
संगमेश्वर तालुक्यातील तांबेडी गावी मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीत राहते घर पुर्ण बेचीराख झाले असुन ग्रामस्थ्यांच्या प्रसंगाधनाने घरातील महिलेचे प्राण वाचल्याचे बोलले जात आहे.
मात्र घराचे मोठे नुकसान झाल्याची माहिती पुढे येत आहे


तांबेडी येथे श्रीमती प्रतिभा पांडुरंग भारती यांच्या मालकीचे घर आहे, मात्र त्या वास्तव्यास पुणे येथे असल्याने त्यांचे गावचे घर बंद असते, मात्र शिमग्यासाठी प्रतिभा भारती या दोन दिवसापुर्वी गावी आल्या होत्या, शनिवारी मध्यरात्री एक च्या सुमारास श्रीमती प्रतिभा यांना आपल्या घराला अचानक आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडओरड केली. शेजारील ग्रामस्थानी भारती यांच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी पुर्ण घराला आगीने वेढा दिल्याचे दिसलें.

                          Advertisement 
त्याच वेळी श्रीमती भारती घरात अडकल्याचे दिसताच ग्रामस्थानी मोठ्या धाडसाने त्यांची सुखरूप सुटका केली.

मात्र श्रीमती भारती यांचे पुर्ण घर आगीच्या भक्षस्थानी पडले, ऐन शिमग्याच्या काळात घर बेचीराख होत असल्याचे पाहुन श्रीमती भारती पुर्णत: कोलमडून पडल्या; त्यांना स्थानिक ग्रामस्थानी धीर देण्याचे काम केले.

याची खबर महसूल विभागाला देण्यात आली; त्यानंतर तांबेडी गावचे तलाठी श्री, विठ्ठल सराई यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन पंचनामा केला. पुर्ण घरासह घरातील सामान पुर्ण जळून गेल्याचे पंचनाम्यात नोंद करुन सुमारे तीन लाख ऐंशी हजाराचे नुकसान झाल्याची नोंद केली आहे.

महावितरणचे उपअभियंता श्री.गोरे यांनी तांबेडी गावी भेट देऊन पाहणी केली आणि शॉर्टसर्किटने आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे.

घटनेची माहिती मिळताच चिपळूण संगमेश्वरचे विद्यमान आमदार श्री शेखर निकम यांनी घटनास्थळाला भेट देऊन श्रीमती प्रतिभा भारती यांना तातडीची आर्थिक मदत केली.

यावेळी राजेंद्र सुर्वे, युवा उद्योजक सिध्देश ब्रीद; सरपंच प्रशांत ब्रीद,अंजिक्य ब्रीद, संतोष बीद्र, राजेद्र बीद्र,अशोक मेस्त्री व ग्रामस्थ आदी उपस्थित होते

तांबेडी येथील घराला आग लागल्याची खबर संगमेश्वर पोलिसांना कळताच संगमेश्वरच्या पोलीस निरिक्षक श्रीमती सुतार यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि ग्रामस्थानी दाखवलेल्या प्रसंगवधानाचे कौतुक केले.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत