#Natepute दुष्काळातही शिंदेवाडी च्या विशाल बाळासाहेब देशमुख यांची ऊस उत्पादनात एकरी शंभर टनाकडे वाटचाल


महादरबार न्यूज नेटवर्क -
माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी येथील शेतकरी विशाल बाळासाहेब देशमुख यांनी पाण्याची कमतरता असूनही एकरी ९६ टन उत्पन्न घेतलेले आहेत,तर हे सर्व शक्य झाले सेंद्रिय खताच्या मदतीने व योग्य मार्गदर्शनाने ,हॉटेल व्यवसाय बघत बघत शेती आवडीने करतात ,त्यामध्ये जास्त वेळ शेतीला देऊन व्यवस्थित नियोजन करून ९६ टन उत्पन्न घेऊन तालुका भर आपले नाव केलेले आहे.

                              Advertisement 


त्यांनी ८६०३२ हे बेणे वापरले आणि चळी,थाप बांधणी अशा प्रकारे अशा पद्धतीने तीन सेंद्रिय खताचे डोज केले व दोन फवारण्या केल्या .त्यामध्ये त्यांनी ३० टक्के रासायनिक खते वापरले व पाऊस कमी असल्यामुळे ऊस लगेच पाण्याला येऊ नये म्हणून ऊसाची पाचट काढली व उसाच्या बुडात पाचटीचे मल्चिंग तयार केले आणि दर पंधरा दिवसाने ऊस मोकळा भिजवला असे त्यांनी सांगितले , ४८ते ५० कांड्यावर ऊस असून ऊसाला वजन आणि जाडी चांगल्या प्रकारे आलेली होती.तालुकाभर विशाल देशमुख यांचे कौतुक केले जात आहे व शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, योग्य खते व योग्य मार्गदर्शन लाभले तर दुष्काळातही १००टन उत्पन्न काढू शकतो असा आदर्श शेतकऱ्यासमोर ठेवला आहे.

देशमुख यांनी कृषी मार्गदर्शक मिश्रा साहेब यांचे मार्गदर्शन घेत  शेती केली आहे. त्यांच्या मार्गदर्शन व सल्याने शक्य झाल्याचे सांगितले तसेच मिश्रा साहेब यांचे खूप खूप आभार मानले आहे.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत