#Yavat मुळा-मुठा नदीवर जलपर्णीची झालर नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न झाला निर्माण
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड तालुक्यातील राहू उंडवडी या दोन गावाच्या मधून मुळा- मुठा नदी वाहत आहे या नदीमध्ये जलपर्णीची झालरच निर्माण झाली आहे असे दिसते, त्या कारणाने नदी काठच्या गावांच्या नागरिकांचे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये आजार वाढण्याच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. जलपर्णीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांकडून मागणी होत आहे.
Advertisement
शहरातील गलिच्छ पाण्यावर जलपर्णी दिसते, पाण्यावर झालर आहे का असे वाटत आहे. या जलपर्णीमुळे मासेमारी व्यवसाय करणारे ना अडचणी येतात .पाण्यात सडलेल्या जलपर्णीच्या पाण्यामुळे मासे मरत आहेत खराब वास येत असून डासची पैदास आहे. या सर्वांमुळे नदी लगत व परिसरातील नागरिकांना साथींच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे .जनांवराना आजार होत आहेत .
नदीकाठच्या गावाना उंडवडी, राहू पिंपळगाव, चे शेतकऱ्यांचे शेतीसाठी पाणी उपसा करत असलेले पंप आहेत या जलपर्णीमुळे शेतकऱ्यांना पाणी उपसा करण्यासाठी अडचणी येतात. शेतकऱ्यांचा या जलपर्णीत अडकून मृत्यु झाल्याच्या मागील काळात घटना घडल्या आहेत. नदीला पाणी कमी झाले की दरवर्षी जानेवारी महिना ते जूनमध्ये पावसाळा सुरू होईपर्यंत या फोफावणाऱ्या जलपर्णीची समस्या निर्माण होत आहे. नदीकाठच्या गावांच्या नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने सामना करावा लागत असलेल्या या जलपर्णीचा कायमचा बिमोड करण्याची मागणी आता नागरिकांमधून होऊ लागली आहे. दरम्यान विधानसभेत आमदार राहुल कुल यांनी मुळा-मुठा नदीमध्ये दरवर्षी जलपर्णीचा प्रश्न निर्माण होत असून नदीमधील जलपर्णी पूर्णपणे नष्ट करण्यासाठी संबंधित प्रशासन काम केले पाहिजे. परंतू हा प्रश्न अजून अनुत्तरीत आहे.
शेतकऱ्यांनी गोठ्यात पंखे लावलेले आहेत ,कारण डास इतके आहेत ते जनावरांना चावतात त्याचा परिणाम दूध निघण्यावर होत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना गोठ्यातच पंखे बसवावे लागत आहेत.
Comments
Post a Comment