Hot Posts

6/recent/ticker-posts

#Yavat वरवंड पुनर्वसन येथे श्रीराम , हनुमान जन्मोत्सव निमित्त अखंड हरिनाम सप्ताह


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड तालुक्यातील वरवंड  (पुनर्वसन, वरसगाव) येथे हनुमान मंदिर चा पन्नासावा सुवर्ण महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी सोहळा श्रीराम जन्म राम , हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला आहे,रोज काकडा, पूजा, ज्ञानेश्वरी पारायण चे वाचन हरिपाठ  धार्मिक कार्यक्रम होतील.

यावर्षी धार्मिक  कार्यक्रम भरगच्च आहेत दिनांक १७,४,२४ ते दिनांक २४,४ २४ पर्यंत हे सर्व कार्यक्रम आहे. दि१७ ला रामचंद्र भरेकर सुनील निवणगुणे यांचे किर्तन, १८रोजी आशाताई हनमघर यांचे कीर्तन ,
१९ रोजी महंत प्रमोद महाराज जगताप यांचे, दि २० रोजी चैतन्य महाराज कबीर आळंदी, दिनांक २१ला संतोष महाराज पायगुडे मांडवी व २२ रोजी चंद्रकांत महाराज वांजळे, दिनांक २३ ला संजय महाराज वाबळे यांचे पहाटे ५ ते ७ देऊळगाव किर्तन  व राम शास्त्री यांचे किर्तन ७  ते ९ , दि २४  ला आसाराम बडे महाराज आळंदी यांचे कीर्तन रोज संध्याकाळी ७ ते ९वाजेपर्यंत आहेत होईल.

काल्याचे किर्तन होईल तरी ग्रामस्थांनी दि२४ ला काल्याचा महाप्रसाद दुपारी २ वाजेपर्यंत  महाप्रसाद घ्यावा ही विनंती आहे. समस्त ग्रामस्थ मंडळ साईव बुद्रक पुनर्वसन वरवंड यांच्या तर्फे हे सांगण्यात आलेले आहे.

Post a Comment

0 Comments