#Baramati महाराष्ट्राचा नावलौकिक चंदुकाका सराफ ने वाढवला - डॉ. चंद्रशेखर मुरूमकर
महादरबार न्यूज नेटवर्क -
बारामती शहर वेगवेगळ्या नावांनी,अंगांनी, वैशिष्ट्यांनी ओळखले जाणारे शहर म्हणून पाहिले जाते. या शहरांमध्ये चंदुकाका सराफ प्रा लि या सुवर्णपेढीने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवल्याचे मत तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मुरूमकर यांनी व्यक्त केले. या सुवर्ण पेढीचा १९७ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
बारामतीचे नूतन पोलीस निरीक्षक श्री संतोष घोळवे श्री रमेश खोमणे डॉक्टर अंकुश खोत सौ सुषमा मुरूमकर, श्री आनंदराव माने, श्री गिरीश नेवसे श्री महेश माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या सुवर्णपेढीने सोन्याची शुद्धता जपता जपता सामाजिक बांधिलकी देखील जोपासली आहे. नावीन्यता,शुद्धता, परंपरा, विश्वास सूत्रांचा वापर करून ग्राहकांच्या मनातला दागिना घडवून देण्याचे काम या सुवर्णपिढीने कायम केले आहे व भविष्यात देखील करत राहणार असल्याचे मत या सुवर्णपेढीचे चेअरमन श्री किशोरकुमार शहा यांनी व्यक्त केले.
दिनांक २०,२१ व २२ एप्रिल पर्यंत ग्राहकांना हिऱ्यांच्या दागिन्यावर १०० % पर्यंत व सोन्याच्या दागिन्यांच्या घडानावळीवर १० % टक्के इतका डिस्काउंट दिला जाणार असून गोल्डन शाईन प्लस व सुवर्णारंभ या योजनेत रुपये २००० च्या पुढे सहभागी झाल्यास चांदीचे नाणे मोफत ठेवले असून या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन चंदुकाका सराफ प्रा लि चे सेल्स हेड श्री दीपक वाबळे यांनी केले आहे.
यावेळी चंदुकाका सराफ च्या संचालिका सौ.नेहा किशोरकुमार शहा,ब्रांच मॅनेजर रोहित आवदे, नवनाथ गिऱ्हे व सर्व स्टाफ उपस्थित होता. सदरील कार्यक्रमासाठी कुलदीप बावणे,कुमार राठोड यांनी मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment