Hot Posts

6/recent/ticker-posts

#Yavat श्री साई भंडारा उत्सव यवत येथे साजरा


महादरबार न्यूज नेटवर्क -  संतोष जगताप 
श्री क्षेत्र शिर्डी निवासी  साईबाबांच्या पादुका दर्शन सोहळा व दरवर्षी साजरा केला जाणारा एकनाथषष्ठी निमित्त श्री साई भंडारा उत्सवाचे आयोजन यवत येथील श्री काळभैरवनाथ मंदिर येथे करण्यात आले होते. 

                         Advertisement  
उत्सवाचे हे २० वे वर्ष असुन यवत येथील साईभक्तांकडून मोठ्या उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गुरुपौर्णिमा निमित्त श्री साईबाबा पालखी सोहळा समिती, पुणे पालखी सोहळ्यात यवत परिसरातील भक्त मोठ्या प्रमाणात सहभागी होत असुन गावातील नागरिकांनाही श्री साई पादुकांच्या दर्शनाचा लाभ मिळावा म्हणून दरवर्षी रंगपंचमी व एकनाथषष्ठी निमित्त श्री साई भंडारा उत्सव साजरा करण्यात येत असतो या निमित्ताने प्रथम दिवशी श्री साई पादुकांचे आगमन , दैनंदिन आरत्यांसह रात्री ह.भ.प दीपक महाराज मोटे  यांचे सुश्राव्य किर्तन झाले तर दुसऱ्या दिवशी पहाटे कांकड आरती, रुद्रअभिषेक , श्री साईसच्चरित पारायण, श्री साईसत्यनारायण महापुजा , माध्यांन्ह आरती , महाप्रसादासह भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला सायंकाळी दिपोत्सव करुन धुपारती करण्यात आली दोन दिवस चाललेल्या या  उत्सवाने यवत परिसर साईमय झाला होता.


रात्री ह.भ.प. राहुल महाराज राजगुरु यांचे सुश्राव्य किर्तन संपन्न झाले यावेळी मृदुंगमणी - ह.भ.प.शुभम महाराज कदम, गायनाचार्य ह.भ.प.गजानन महाराज सोमटकर ह.भ.प. संतोष महाराज कोलते, ह.भ.प. बबन आण्णा राजगुरू, ह.भ.प. तुषार महाराज वाघमारे यांसह यवत परिसरातील विविध भजनी मंडळ यांनी कीर्तनास साथ - संगत केली ,  कल्पना स्पीकर व मंडप मंडप यांच्यावतीने आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती , आज पहाटे कांकड आरती व आभिषेक होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे आयोजन श्री साईचरण सेवा मंडळ , यवत यांच्या वतीने करण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments