महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड तालुक्यातील यवत,वरवंड केडगाव ,पाटस, राहू ,कुरकुंभ हे आठवडे बाजारात वाढत्या उष्णतेमुळे ग्राहक बाजारात फिरकतच नाहीअसे व्यापारी वर्गातून बोलले जात आहे.
Advertisement
तालुक्यातील या सर्व बाजारात दुपारची ग्राहक नगण्य असतात. वाढत्या उष्णतेची तापमानामुळे ग्राहक कमी होत आहे व्यापारी वर्ग तरकरी ,फळे मिठाई ,धान्य, कपड्याचे विक्रेते दुपारचे ग्राहक विना बाजरात बसलेले असतात. तापमान ३८ ते ४० डिग्री सेल्सिअस आहे त्यामुळे उन्हाने सर्वांचीच हालत बेकार होत आहे . उष्णतेमुळे बाजारात व्यापारी प्लास्टिकचे छत टाकून आपले दुकाने लावतात.
सकाळी व्यापारी बाजारात लवकर येतात आपले दुकाने लावतात परंतू संध्याकाळीच बाजारात गर्दी वाढत असते.
यवत येथील आठवडे बाजारात लोक संध्याकाळी ५नंतर येतात वाढत्या तापमानामुळे बाजारातील गर्दी सुद्धा कमी होत आहे.
दुपारचे ग्राहक कमी असतात गवार ,मिरची ,भेंडी, दोडका,कारले, या तरकारीचे वजन घटतात.उष्णता वाढली तर तरकारीचे दर वाढतील.
दीपक शिंदे (तरकारी व्यापारी)वरवंड
0 Comments