महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील ओम सचिन गाटे याने सिबीएस ई दहावीच्या परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन केले. त्याने ९७.२० टक्के गुण मिळवित सातारा येथील सैनीक स्कुलमध्ये प्रथम क्रमांक संपादन केला.त्याने गणीत व समाजशास्त्र विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले.
पिलीव सारख्या ग्रामीण भागातुन जाऊन सातारा येथील नामांकीत सैनीक स्कुलमध्ये दैदीप्यमान यश संपादन केल्याबद्दल ओमचे सर्व क्षेत्रातील मान्यवराकडुन अभिनंदन व कौतुक होत आहे. माळशिरस तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटी अकलुज चे संचालक सचिन गाटे यांचा तो मुलगा आहे. ओमच्या हया यशाबददल माळशिरस पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार करडे यांनी ओमचे विशेष अभिनंदन केले.
0 Comments