महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड तालुक्यातील माणकोबावाडी यवत या ठिकाणी आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती व नाथदेवराई फाउंडेशन वर्धापन दिनाचे औचित्य साधत नाथदेवराई फाउंडेशन व माणकोबावाडी ग्रामस्थांनी पिंपळ वृक्षाला फाउंडेशन चा अध्यक्ष घोषित करून ७९९ देशी वृक्षांचे वाटप करत हा महावृक्षदान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला.
यावेळी प्रमुख पाहुणे महेश रूपनवर आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्या हस्ते अहिल्यादेवी च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. तसेच नाथदेवराई फाउंडेशन यांनी पिंपळ वृक्षाला अध्यक्ष म्हणून स्थान दिल्याने द इकोफॅक्टरी फाउंडेशन चे प्रतिनिधी शुभम ठोंबरे व यवत ग्रामपंचायत सरपंच समिर दोरगे यांच्या हस्ते वृक्षपूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशन सदस्य राहुल बिचकुले यांनी केले. त्यांनी फाउंडेशन कार्याचा आढावा मांडत भविष्यातील फाउंडेशन वाटचालीविषयी माहिती दिली. तसेच प्रमुख पाहुणे महेश रूपनवर आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी उपस्थित ग्रामस्थांना अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याविषयी तसेच बांधावर झाडांचे महत्व, परसबाग काळाची गरज, वाढते तापमान अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक विनायक जगताप यांनी शेतकऱ्यांना व उपस्थित ग्रामस्थांना शेती योजनांविषयी मार्गदर्शन केले. संस्कृती अभ्यासक श्रीकांत हंडाळ यांनी या कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले.
ग्लोबल वार्मिग हे ग्रामीण भागात समजत नसले तरी वाढते तापमान हे सर्वांना जाणवत आहे. याकडे विशेष लक्ष वेधले जावे या हेतूने नाथदेवराई फाउंडेशन गेली सहा वर्षे महावृक्षदान सोहळा आयोजित करत आहे. आजवर अनेक वृक्षांचे वृक्षारोपण या फाउंडेशनने केले आहे. या माध्यमातुन अनेक झाडे आज डौलाने डोलत आहेत आणि लोकांमध्ये वृक्षप्रेम जागृत होत आहे. यासाठीच या फाउंडेशनने ७९९ देशी वृक्षांचे वाटप केले आहे. आणि यापुढे पिंपळ या वृक्षाला अध्यक्ष घोषित करून सर्व माणकोबावाडी ग्रामस्थ फाउंडेशन सदस्य म्हणुन काम करणार आहेत.
यानंतर माणकोबावाडीतील ग्रामस्थांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा वृक्ष व गुलाब पुष्प भेट देऊन सन्मान करण्यात आला. आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ७९९ देशी वृक्षांचे वृक्षवाटप करण्यात आले. यामध्ये वड, पिंपळ, चिंच, आवळा, करंज, भेंडी, कांचन, गुलमोहर, बेहडा, पळस, उंबर, जांभुळ, सिसम, इलायती चिंच, अशा वेगवेगळ्या वृक्षांचा समावेश होता. हे महावृक्ष दान सौजन्य द इकोफॅक्टरी फाउंडेशन पुणे आणि सीमा गुट्टे कॉंग्रेस महाराष्ट्र यांनी केले. या महावृक्ष दान सोहळ्याचे आयोजन नाथदेवराई फाउंडेशन यांनी केले.
यावेळी यवत ग्रामपंचायत सरपंच समीर दोरगे, आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनवर, कृषी पर्यवेक्षक मनोज मिसाळ, कृषी सहाय्यक विनायक जगताप, कृषी सहाय्यक पंढरीनाथ कुतवळ, यवत ग्रामपंचायत मा. उपसरपंच सदानंद दोरगे, सीमा गुट्टे महाराष्ट्र कॉंग्रेस, संस्कृती अभ्यासक श्रीकांत हंडाळ, सिद्धनाथ तरुण मंडळ अध्यक्ष मारुती बिचकुले, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते धुळा भिसे, ग्रामपंचायत सदस्य मल्हारी बिचकुले, रासप दौंड अध्यक्ष दादासाहेब भिसे, सामाजिक कार्यकर्ते मनोहर खताळ, राजु लकडे, पत्रकार संतोष जगताप, फाउंडेशन सदस्य राहुल बिचकुले, दत्तात्रय पिंगळे, सुभाष बिचकुले, दादा भिसे, नटराज गायकवाड, प्रशांत पिंगळे, कैलास पिंगळे, राजु बिचकुले, माऊली खताळ, अमोल खताळ, मोहन बिचकुले, पोपट लकडे, बापू लकडे, विशाल खताळ, अविनाश लकडे, यांसह इतर सदस्य माणकोबावाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करणे हीच पुण्यश्लोक अहिल्यादेवींना खरी आदरांजली ठरेल – रुपनवर
0 Comments