#Chiplun कोकणातील पात्र महाविद्यालयांना अनुदान द्यावे व महिलांच्या शेतीविषयक मागण्या पूर्ण कराव्यात

आ. शेखर निकम यांची पावसाळी अधिवेशनात मागणी


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव  
चिपळूण संगमेश्वर तालुक्यातील जी अनुदान पात्र महाविद्यालये आहेत त्यांना अनुदान द्यावे व आझाद मैदानात उपोषणास बसलेल्या महिलांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी आ. शेखर निकम यांनी पावसाळी अधिवेशनात केली.
    
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, कोकणामध्ये शेती असेल, शेतीपूरक व्यवसाय असेल, फूड प्रोसेसिंग असेल किंवा अन्य व्यवसाय असेल या व्यवसायामध्ये शासनाच्या उमेद उपक्रमाच्या माध्यमातून अनेक उपयोगी आणि चांगल्या पद्धतीच्या घडामोडी राबवल्या जातात. आझाद मैदानात गेले तीन दिवस महिला उपोषणाला बसलेल्या आहेत. यासंबंधी तातडीने निर्देश द्यावेत आणि हे उपोषण मागे घेण्यासाठी त्यांच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात.
तसेच सन २००१ पासून जी महाविद्यालये अनुदानास पात्र आहेत परंतु त्या महाविद्यालयांना अनुदान देण्यास खूप टाळाटाळ केली जाते त्यांचे प्रश्न या अधिवेशनात मंत्रिमंडळासमोर घेऊन निकाली लावावे. कारण यातले बरेचसे कर्मचारी आता निवृत्तीच्या जवळ आलेले आहेत त्यामुळे याही विषयाकडे गांभीर्याने पाहिले जावे.
   
आ. शेखर निकम यांनी सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आतापर्यंत कोकणातील अनेक प्रश्न व अपेक्षित विकासकामांचे आराखडे सभागृहापुढे मांडले आहेत. आपल्या मागण्या केवळ मांडण्यापुरत्या मर्यादित न ठेवता त्या पूर्ण करणेकामी कटिबद्ध असल्याचे त्यांनी कोकणवासीयांना आश्वासन दिले आहे. कोकणचा विकास केवळ आ. निकम यांच्यामुळेच शक्य आहे हे माहीत असल्याने कोकणवासीयांचा देखील त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत