#Natepute माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात हरी नामाच्या गजरात भव्य स्वागत


महादरबार न्यूज नेटवर्क -
पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यासाठी विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने आळंदीतून निघालेल्या संतश्रेष्ठ ‘श्री’ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे हरी नामाच्या गजरात आज दि.११रोजी सोलापूर जिल्ह्यात   धर्मपुरी  येथे १० वाजुन५८ मि आगमन झाले. 

जिल्हा प्रशासनाच्यावतीने  पालकमंत्री चंद्रकांत पाटील , खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद  यांनी माऊलींच्या पादुकांचे पूजन करून पालखीचे स्वागत केले.


संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी स्वागत समारंभास माजी आमदार रामहरी रूपनवर, राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, हनुमंत (बापू) सुळ ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,  प्रांताधिकारी माळी , अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, माळशिरसचे तहसीलदार शेजूळ , गट विकास अधिकारी मनोज राऊत,मा.पंचायत समिती सदस्य माऊली पाटील,मा.जिल्हा परिषद सदस्या ऋतुजाताई मोरे ,सरपंच नीता नवनाथ झेंडे, उपसरपंच नितीन निगडे ,
महावितरण अधिकारी ओंकार नरवडे, सोनवणे , दत्तात्रय रुपनवर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले, तालुका आरोग्य अधिकारी शिंदे मॅडम, डॉक्टर परतवार मॅडम आदी उपस्थित होते.




Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम