#Yavat उजनी धरणाच्या फुगवटा क्षेत्रातील बाधिताचे संपादन व पुनर्वसन प्रक्रिया तातडीने पूर्ण करा


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
पावसाळी अधिवेशन २०२४ - उजनी धरणाच्या संपादित क्षेत्रात येणाऱ्या खानोटा गावाचे अंशतः पुनर्वसन झाले असून उजनी धरणाच्या फुगवटा क्षेत्रातील ओलाव्यामुळे बाधित १२८ घरांचे संपादन व पुनर्वसन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यासाठी शासनाने कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी केली आहे.

तसेच दौंड तालुक्यातील १९७५ पूर्वी पुनर्वसन झालेल्या गावठाणांना विकास कामासाठी निधी मिळण्याबाबत दाखल करण्यात आलेला प्रस्ताव लालफितीत अडकला असून त्यास मान्यता देण्यात यावी, पुनर्वसन झालेल्या जमिनीवर वर्ग २ चे लागलेले शेरे कमी करण्याबाबत शासनाने आदेश दिले असून अद्याप देखील शेरे कमी झालेले नाहीत याबाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केला शासनाने तातडीने याबाबत आवश्यक कार्यवाही करावी अशी आग्रही मागणी केली

याबाबत मंत्री हसन मुश्रीफ  यांनी खानोटा, ता. दौंड येथील पुनर्वसन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे व याबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम