#Chiplun शेखर निकम यांच्यासारखा आदर्श आमदार लाभणे आमचं भाग्य - चिपळूण तालुका मुस्लिम समाज

सभागृहासाठी सव्वा कोटींचा निधी दिल्याबद्दल सावर्डेत जाऊन सत्कार


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
जो शब्द दिला तो कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणे हीच आमदार शेखर निकम यांची ओळख आहे. त्यामुळे असा आदर्श आमदार आमच्या चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाला लाभला हे आमचं भाग्य आहे. सरांनी चिपळूण तालूक्यातील मुस्लिम समाजावर  भरभरून प्रेम केलं आणि पावलोपावली सहकार्यही केल.  आता समाजाच्या सभागृहाला त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून खास बाब म्हणून तब्बल सव्वा कोटा निधी मिळवला. राज्यात एकाच कामाला एव्हढा निधी मिळवणे हे सोपं नाही. सर यापुढे आपल्याला मंत्री म्हणून पाहायचं आहे. त्यासाठी पूर्ण ताकदीने पाठीशी उभे राहू अशी ग्वाही चिपळूण तालुका मुस्लिम समाज पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी आमदार निकम यांना दिली.

चिपळूण विधानसभा मतदारसंघातील सर्वागिण विकासासाठी वारेमाप निधी आणण्याचा उच्चांक करणाया आमदार निकम यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. चिपळूण तालूका मुस्लिम समाजाकडून अत्याधुनिक सभागृहाची निर्मिती करण्यात येत असून त्यासाठी बांधण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतीसाठी मोठ्या निधीची आवश्यकता होती. समाजाच्यावतीने निकम यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. त्यासाठी एवढा मोठा निधी आणून देण्याचा शब्दही निकम यांनी दिला होता. अखेर दिलेला हा शब्द निकम यांनी उपमुख्यमंत्री पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून खरा करून दाखवला. त्यामुळा राज्यात फक्त आणि फक्त एकाच कामासाठी कोणालाही न मिळालेला 25-15 योजनेतुन तब्बल सव्वा कोटींचा निधी खास बाब म्हणून मिळाला. मुस्लिम समाजाचा महत्वाचा प्रश्न यानिमित्ताने मार्गी लागल्याने समाजामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. 

शुक्रवारी मुस्लिम समाज अध्यक्ष सलीम कास्कर, कार्याध्यक्ष नाझीम अफवारे, उपाध्यक्ष शमशुद्दीन सनगे, खजिनदार रऊफ वांगडे, यासिन दळवी, बरकत पाते, इम्रान खतिब, इम्रान कोंडकरी, जहिर पुंडलिक, खालीद दाभोळकर, समीर पटेल, जफर कटमाले, लियाकत खतिब, फैय्याज देसाई, इकबाल मुकादम, सरफराज घारे, अमिन परकार, नूर बिजले, डॉ. अब्बास जबले, बशीर फकीर, मुजाहीब मेयर, अजमल दलवाई, निसार कटमाले, जमीर मुल्लाजी, समीर काझी आदीनी शुक्रवारी सावर्डेत जाऊन आमदार निकम यां सत्कार केला. 
 
यावेळी मुस्लिम समाज नेत्यानी आमदार शेखर निकम यांच्या कार्यपध्दतीचे कौतुक करताना सांगीतले की, सर, तुमच्यासारखा आमदार आम्हाला मिळणे हे आमचं भाग्य आहे. आजपर्यत कुणीही आमच्या समाजासाठी जेवढं केलं नाही त्याहून कितीतरी पटीने तुम्ही आमच्यासाठी केलेलं आहे. सभागृह उभारणीपासून यापुर्वा 40 लाखा निधी उपलब्ध करून दिलात. संरक्षण भिंतीचे काम मोठं असल्याने त्यासाठीही तुम्ही तुमो सर्वस्व पणाला लावलतं आणि आम्हाला दिलेला शब्द पूर्ण करत सव्वा कोटा निधी दिलात आणि आदर्शवत कामगिरी बजावलीत. याबद्दल संपूर्ण समाजाच्या वतीने तुम्हाला लाख लाख धन्यवाद. यापुढे तुम्हाला मंत्री म्हणून आम्हाला पहायाचे आहे अशा शब्दात निकम यांच्या कार्याचा समाजनेत्यांकडून गौरव करण्यात आला.  यापुढेही सहकार्य करत राहणार.

आज जो निधी प्राप्त झाला तो निव्वळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे. यापुढेही या सभागृहासाठी अन्य वेगवेगळया माध्यमातून निधी उभारण्यासाठी प्रयत्न करीत आहे. मी केवळ मुस्लिम समाजासाठी नव्हे तर माझ्या मतदारसंघात असणाऱ्या अनेक समाजाच्या सभागृहासाठी निधी दिलेला आहे. मी करत असलेल्या कोणत्याही कामाकडे राजकीय भावनेतून पहात नाही. आपल्याला सर्व सर्व जाती धर्माला साथीला घेऊन विकास साधाया आहे. त्यामुळे यापुढेही सर्वांसाठी काम करत राहू अशी ग्वाही आमदार शेखर निकम यांनी यावेळी सत्काराला उत्तर देताना दिली.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम