महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
श्री क्षेत्र मार्लेश्वरच्या पर्यटनाची गुणवत्ता आणि सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन अंतर्गत १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच या प्रकल्पांसाठी टेंडर प्रक्रिया अंतीम टप्प्यात आहे. प्रमुख प्रकल्पांमध्ये खालील सुधारणा करण्यात येणार आहेत:
१.कमानी पुलाचे (आर्च ब्रीज) बांधकाम – मार्लेश्वर मंदिर ते दत्त मंदिर दरम्यानच्या नदीवर.
२. व्हिव गॅलरीचे बांधकाम – श्री क्षेत्र मार्लेश्वर मंदिर परिसरात.
३. भक्त निवास व सभामंडप – भक्तांच्या सोयीसाठी निवास आणि सभामंडपाची व्यवस्था.
४. पालखी मार्गाचा विकास – प्रमुख पालखी मार्गाची सुधारणा.
५. स्वच्छतागृह आणि चेंजिग रूम – श्रद्धाळुंसाठी सुविधा.
६. वाहतळाचा विकास – स्थानिक वाहतुक व्यवस्थेचा सुधारणा.
७. विद्युतीकरण व मैदान विकास – सर्व भागांत विद्युत पुरवठा व नूतनीकरण.
८. संरक्षक भिंती – धोकादायक ठिकाणी संरक्षक भिंतींचे बांधकाम.
९. लॅन्डस्केपिंग आणि आरसीसी डिझाईन – परिसराची आकर्षक सजावट.
१०. पाणी पुरवठा आणि पाथवे – पाणी पुरवठा व्यवस्था आणि पाथवेचे बांधकाम.
तसेच, हॅम अंतर्गत तळेकांटे, देवरुख, मुरादपूर, मारळ, बामणोली, खडीकोळवण, ओझरे, कळकदरा आणि मारळ मार्लेश्वर रस्ता रुंदीकरणासाठी १८५ कोटी रुपये मंजूर झाले असून, याची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
टिकळेश्वर देवस्थान विकासासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर
टिकळेश्वर देवस्थानच्या विकासासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून मुख्य कामे अशी असतील:
१. टिकळेश्वर देवस्थान मंदिराकडे जाणारा रस्ता तयार करणे.
२. स्वच्छतागृह आणि पेव्हर पाखाडी बांधणे.
३. रेलिंगची स्थापना – परिसरातील सुरक्षितता सुनिश्चित करणे.
तसेच, जिल्हा नियोजन मार्फत ४५ लाख रुपयांच्या विद्युतीकरणाच्या कामाची पूर्णता झाली आहे. येत्या काळात टिकळेश्वर देवस्थानसाठी आणखी ३ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली असून, ती लवकरच मंजूर होईल.
सदर काम अजय जाधव या ठेकेदाराला मिळालेले आहे.
महिपत गड प्रकल्पासाठी ३.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर
महिपत गडाच्या विकासासाठी ३.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. गडाकडे जाणारा रस्ता तयार करणे, संरक्षक भिंती बांधणे आणि गडाच्या मंदिरासाठी मेघडंबरीचे बांधकाम या प्रमुख कार्यांसह गडाच्या आकर्षकतेत वाढ केली जाईल.
सदरचे काम सुनंदा कंट्रक्शन यांना मिळालेले आहे.
छत्रपती संभाजी स्मारकासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर
छत्रपती संभाजी स्मारक, कसबा येथे ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून प्रमुख कामे अशी आहेत
१. पुतळ्याच्या कक्षासाठी मेघडंबरी बांधणे.
२. मुख्य प्रवेशद्वारासाठी कमान बांधणे.
३. पुतळ्याजवळ कमान बांधणे.
३. पीसीसी कॉक्रिट वाहनतळाची बांधणी.
५. ॲश्लर दगडाचे बांधकाम – स्मारकाच्या शिल्प सौंदर्य वाढवणे.
६. संपूर्ण परिसर सुशोभिकरण व गार्डनिंग.
7७. पालखी मार्गावर पेव्हींग ब्लॉक बसविणे.
स्मारकाची शोभा आणि त्याचा ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, या प्रकल्पामध्ये सर्वांच्या सहकार्याने एक भव्य स्मारक उभारण्याचे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे. असलेल्या जागेचा प्रलंबीत प्रश्न लवकर महायुतीच्या व सर्वांच्या साथीने सोडवून एक भव्य दिव्य स्मारक उभारण्यास प्रयत्न करुया असे आ. निकम यांनी सांगितले.

या सर्व प्रकल्पांचा उद्देश एकाच गोष्टीवर आधारित आहे, आणि ती म्हणजे या धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांचा विकास. पर्यटन क्षेत्रातील एकात्मिक विकासाच्या माध्यमातून हे स्थळे अधिक आकर्षक बनवणे आणि पर्यटकांसाठी उत्कृष्ट सुविधा पुरवणे, हे या योजनेचे मुख्य ध्येय आहे. या साऱ्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासन आणि प्रादेशिक पर्यटन विभागाने आवश्यक ते सर्व पाऊल उचलले असून, लवकरच या कामांचा शुभारंभ होईल, असेही आ. शेखर निकम यांनी सांगितले.
0 Comments