Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun आ. शेखर निकम यांच्या मार्गदशनाखाली देवरुख शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे गुणवंत विध्यार्थांचा सत्कार समारंभ

देवरुखमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न –रा. कॉ.महिला.महाराष्ट्र प्रदेश  उपाध्यक्ष सौ. पूजा निकम मॅडम यांच्या हस्ते सन्मान


“जिद्द, चिकाटी आणि मेहनत यशाचे खरे शस्त्र आहेत; गुणवत्तेला प्रोत्साहन देणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे” – पूजा निकम मॅडम



महा दरबार न्यूज नेटवर्क -  विलास गुरव
येथील राष्ट्रवादी काँग्रेस  जनसंपर्क कार्यालय येथे यंदा दहावी व बारावी परीक्षेत उत्तुंग यश संपादन करणाऱ्या ३९ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पूजा निकम मॅडम उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आले.

यावेळी बोलताना  निकम मॅडम म्हणाले, “विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर पुढे वाटचाल केली, तर यश नक्कीच गवसते. आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ गुणांकन नव्हे तर उत्तम व्यक्तिमत्व, सजग दृष्टिकोन आणि समाजहिताचे भान असणारे नागरिक घडवणं महत्त्वाचं आहे.”

शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रातही योगदान देण्याचा आमचा प्रयत्न असून देवरुख परिसरात युवकांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपण कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
स्पर्धा परीक्षांसाठी तयार व्हा – निकम मॅडम यांचा विद्यार्थ्यांना संदेश

“बिहारसारख्या राज्यांतील विद्यार्थ्यांकडून आपल्याला शिकण्यासारखं आहे. तेथे सातत्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे अधिकारी मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत. आपल्यालाही त्या दिशेने प्रयत्न करावे लागतील,” असा दूरदृष्टीपूर्ण सल्ला त्यांनी दिला.

या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर देवरुख शहर अध्यक्ष हनिफ शेठ हरचिरकर, मानसी करंबेळे,बाळू शेठ ढवळे, प्रफुल्ल भुवड, पंकज पुसाळकर, बंडू जाधव, राजू वनकुंद्रे, अक्षदा सावंत, गायत्री बने,तळेकर मॅडम, निधी पंदेरे, अरुणा अनेराव,संजना नलावडे,भविका करंडे,स्नेहल गुरव, चैत्राली जाधव, तब्बू खांचे,शबाना खतीब, नेत्रा बेटकर, प्राजक्ता लिंबुकर, अजिता साबळे, सनम साटविलकर,अपर्णा परब, खेडेकर मॅडम,यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस महिला पदाधिकारी व अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत “देवरुख शहराचे नाव सर्वच क्षेत्रात उजळवणारी पिढी घडवावी” असे उद्गार काढले. “पालकांच्या अपेक्षा पूर्ण करणारी मुले घडवण्यासाठी समाजानेही सकारात्मक वातावरण निर्माण करावे,” असेही मत व्यक्त झाले.

Post a Comment

0 Comments