महादरबार न्यूज नेटवर्क -
वडघर (तालुका राजगड) जिल्हा पुणे, येथील लोकनियुक्त्त सरपंच सौ. सुवर्णाताई नथुराम डोईफोडे यांना अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड यांच्यावतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्ताने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अहिल्या रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सरपंच सुवर्णाताई डोईफोडे यांना माजी आमदार रामहरी रुपनवर, प्रवीण जी काकडे ऑल इंडिया धनगर समाज महासंघ प्रदेशाध्यक्ष, सद्गुरु साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख तुकाराम दादा कोकरे, अध्यक्ष अनंतराव कचरे, मावळ अध्यक्ष बाबुराव शेडगे, सामाजिक कार्यकर्ते नथुराम डोईफोडे, अक्षय डोईफोडे, वैभव मरगळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहिल्या रत्न पुरस्कार दिल्याबद्दल आयोजकांचे आभार तसेच भविष्यातही माझ्या ग्रामीण भागातील सामाजिक कामे खूप मोठ्या जोमाने सुरू ठेवणार आहोत.
सुवर्णा ताई डोईफोडे
सरपंच वडघर ग्रामपंचायत
सरपंच वडघर ग्रामपंचायत
0 Comments