Hot Posts

6/recent/ticker-posts

#Madha फुले सुपर बायोमिक्स ठरणार जैविक पीक उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान - डॉ स्वाती कदम


महादरबार न्यूज नेटवर्क -
विकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद मौजे बिटरगाव  तालुका माढा या ठिकाणी आयोजित करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी डॉ स्वाती कदम यांनी फुले सुपर बायोमिक्स वापरा संदर्भात माहिती दरम्यान बायोमिक्स हे सहा बुरशी व पाच जिवाणू यांचे कॉम्बिनेशन असून यामुळे जमिनीतून व हवेतून उद्भवणारे बुरशीजन्य रोग पिकांना होणार नाहीत तसेच जमिनीतील बुरशी च्या जागृत करण्याचे काम या बायोमिक्सद्वारे होऊ शकते असे त्या बोलताना म्हणाल्या. बायोमिक्स हे सर्व भाजीपाला पिके, फळ पिके,कडधान्य पिके व तृणधान्य पिकासाठी वापरता येते.

तसेच याचा वापर आळवणी साठी 200 मिली प्रति 10 लिटर पाण्यात, ठिबक सिंचनाद्वारे दोन लिटर बाय मिक्स 200 लिटर पाण्यातून द्यावे व फवारणीसाठी शंभर मिली फुले सुपर बायोमिक्स प्रतीक दहा लिटर पाण्यातून मिसळून फवारणी करण्याचे आव्हान डॉ.स्वाती कदम यांनी या कार्यक्रम प्रसंगी केले.

या कार्यक्रमात डॉ पिंकी रायगोंड, डॉ बसवराज रायगोंड, डॉ तानाजी वळकुंडे, डॉ विशाल वैरागर आदींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले .

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री हनुमंत बोराटे मंडळ कृषी अधिकारी कुर्डुवाडी उप कृषि अधिकारी श्री. एस. ए. सर्जेराव सहाय्यक कृषि अधिकारी श्री. के. एस. शेंडगे, श्री.एस.व्ही. घुगे यांनी प्रयत्न केले तसेच यावेळी परिसरातील शेतकरी बंधू भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments