Hot Posts

6/recent/ticker-posts

#Sangola डाळिंब पिकातील तेल्या व मर रोग व्यवस्थापना विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन...

शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


महादरबार न्यूज नेटवर्क -
डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर, भरडधान्य संशोधन केंद्र सोलापूर, कृषी संशोधन केंद्र पंढरपूर ,कृषी विभाग सांगोला व कृषी विज्ञान केंद्र मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.९ रोजी सांगोला तालुक्यातील खिल्लारवाडी गायगव्हाण व महूद याठिकाणी आयोजित कार्यक्रमांमध्ये डॉ पिंकी रायगोंड वरिष्ठ शास्त्रज्ञ यांनी सध्या परिस्थितीमध्ये मर व तेल्या रोगाचे व्यवस्थापन करण्याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

डॉ रमेश भदाणे शास्त्रज्ञ मका पीक लागवड तंत्रज्ञान समजावून सांगितले. डॉ.विशाल वैरागर यांनी जलतारा प्रकल्पाविषयी, डॉ स्वाती कदम यांनी बीज प्रक्रियेचे महत्त्व डॉ. वळकुंडे यांनी पशुधन दूध व्यवस्थापन डॉ.बसवराज रायगोंड यांनी भरड धान्य लागवडी विषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रम प्रसंगी लक्ष्मी गोडसे सरपंच व विनायक बागल उपसरपंच खिलारवडी, अनिता कांबळे सरपंच गायगव्हाण व श्री विनायक डहाळे सरपंच संजीवनी लुबाळ उपसरपंच महूद यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्री मेघराज पौंळ तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सांगोला यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी  करण्यासाठी श्री तुषार अहिरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments