Hot Posts

6/recent/ticker-posts

#Mohol सामूहिक शेतीच्या माध्यमातून आर्थिक उन्नती शक्य - दिपाली जाधव


महादरबार न्यूज नेटवर्क -
दि.  10 जून 2025 रोजी विकसित कृषी संकल्प अभियान द्वारे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र मोहोळ जिल्हा सोलापूर तसेच कृषी विभाग ,सांगोला महाराष्ट्र शासन आत्मा सोलापूर व राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर आणि भारतीय भरडधान्य संशोधन संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील गावोगाव जाऊन नवनवीन तंत्रज्ञान त्यामध्ये बीबीएफ तंत्रज्ञान, तूर शेंडा खुडनी, सुपर केन नर्सरी, जलतारा, पशुसंवर्धन, माती परीक्षण या विविध विषया वर कृषी संकल्प रथ कमलापूर, य. मंगेवाडी, आजनाळे या गावी फिरवून मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी तालुका कृषी अधिकारी सौ. दिपाली जाधव मॅडम बोलत असताना गटशेती करण्याचे आवाहन केले.गटशेतीचे अनेक फायदे आहेत. या माध्यमातून शेतकरी एकत्र येऊन शेती करतात, ज्यामुळे त्यांना अधिक फायदा होतो. गटशेतीमुळे शेती निविष्ठा, मनुष्यबळ आणि इतर संसाधने एकत्रितपणे वापरता येतात, ज्यामुळे खर्चात बचत होते आणि उत्पादकता वाढते. तसेच गट असणाऱ्यांना विविध बियाणे 100 टक्के अनुदानावर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले,  यामध्ये श्री तानाजी वाळकुंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. स्वाती कदम यांनी सुपर केन नर्सरी व बीबीएफ तंत्रज्ञान, डॉ. विशाल वैरागर यांनी जलतारा व दामिनी ॲप तसेच डॉ.बसवराज रायगुंड, राष्ट्रीय भरडधान्य संस्था सोलापूर यांनी विविध भरड धान्यांविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.29 मे 2025 पासून सुरू  विकसित कृषी संकल्प रथ गावोगाव फिरवून मार्गदर्शन करण्यात आले.

सदर कार्यक्रमास मंडळ कृषि अधिकारी श्री. भांगे साहेब, उप कृषि अधिकारी श्री. चव्हाण साहेब, सहाय्यक कृषि अधिकारी   श्रीमती. वाघमारे मॅडम, कु. गायकवाड मॅडम,श्री. व्ही. व्ही. पाटील साहेब, श्री.कुंभार साहेब, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा श्री. सोनवणे साहेब तसेचगावातील सरपंच, उपसरपंच व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments