महादरबार न्यूज नेटवर्क - माननीय केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या संकल्पनेतून 29 मे ते 12 जून 2025 दरम्यान कृषी संकल्प अभियान हा जन राष्ट्रीय जनजागृती कार्यक्रम खरीप हंगामाच्या पूर्वतयारी व मार्गदर्शनाच्या अनुषंगाने कृषी विद्यापीठ राहुरी राष्ट्रीय संशोधन केंद्र यांनी विकसित केलेले कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या दारी पोहोचवण्या करता महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र मोहोळ कृषी विभाग महाराष्ट्र शासन आत्मा सोलापूर राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर भारतीय भरड धान्य संशोधन संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यामधील 90 गावांमध्ये राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या समारोह प्रसंगी माननीय आमदार श्री राजाभाऊ खरे साहेब उपस्थित होते. त्या प्रसंगी शेतकऱ्यांना शुद्ध बियाणे मिळावे व शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे असे आवाहन त्यांनी केले. डॉ.स्वाती कदम यांनी सुपर केन नर्सरी तंत्रज्ञान, डॉ. विशाल वैरागर यांनी जलतारा प्रकल्पाबद्दल माहिती दिली. या कार्यक्रम प्रसंगी डॉ. बसवराज रायगोंड संशोधन केंद्र सोलापूर तसेच डॉ. पिंकी रायगोंड डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. तानाजी वळकुंडे यांनी केले कार्यक्रमादरम्यान कृषी विज्ञान केंद्र मोहोळ यांच्या मार्गदर्शनाद्वारे सिताफळ रबडी व जांभूळ कुल्फी चे अनावरण करण्यात आले, कुल्फी व सिताफळ रबडी बनवणारे श्री राजकुमार अतकरे व त्यांच्या सुविद्य पत्नी यांचा सत्कार माननीय आमदार श्री राजाभाऊ खरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी विविध पिकांच्या पिका स्पर्धेमध्ये क्रमांक पटकावलेल्या शेतकऱ्यांचे देखील स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मा.डॉ. प्रकल्प संचालक आत्मा सोलापूर तसेच मा.श्री रामचंद्र माळी, उपविभागीय कृषी अधिकारी सोलापूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. चरणसिंग चावरे सर, श्री सोनटक्के सर श्री. सरफराज सर, समस्त ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments