महादरबार न्यूज नेटवर्क -
दिनांक १०/०६/२५: कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ विकसित कृषी संकल्प अंतर्गत पंढरपूर तालुक्यामधील वाखरी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना मृदशास्त्रज्ञ श्रीमती काजल जाधव म्हात्रे यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना मातीचे आरोग्य व ते आरोग्य सुधारण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना याबद्दल माहिती देताना नैसर्गिक शेती शेतकऱ्यांसाठी एक चांगला पर्याय आहे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच कृषी विज्ञान केंद्रामध्ये वापरण्यात येणाऱ्या सर्व सेंद्रिय निविष्ठा जसे की बीजामृत,जीवामृत, अमृत पाणी, अमिल अर्क अशा प्रकारच्या निविष्ठा निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात येते याबद्दल सविस्तर माहिती दिली.
त्याचबरोबर अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विषयाचे विषय तज्ञ श्री दिनेश क्षीरसागर यांनी अन्न प्रक्रिया उद्योग उभारणी, आवश्यक यंत्रसामुग्री, पॅकेजिंग तंत्रज्ञान, प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना व सहाय्यभूत शासकीय योजना बाबत सखोल मार्गदर्शन केले. डॉ. पंकज मडावी यांनी खरीप पिकांमधील तूर, मका, उडीद या पिकांमधील कीड व रोग व्यवस्थापना मधील ठळक मुद्दे स्पष्ट केले. डॉक्टर शिल्पा परशुराम यांनी डाळिंब पिकांमधील मर व तेला रोग व्यवस्थापना बद्दल माहिती दिली. डॉ परशुराम पत्रोटी यांनी आहारामधील भरड धान्याचे महत्त्व याबद्दल मार्गदर्शन करताना शेतकऱ्यांना राळा, भगर या पिकाचे उत्पादन घेण्यासाठी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री सुयोग ठाकरे ,श्री महेश बाबर, किरण चव्हाण, वैभव माने यांचे सहकार्य लाभले.
0 Comments