Hot Posts

6/recent/ticker-posts

#Nanded धर्माबाद मध्ये अंगदान जीवन-संजीवनी अभियान मार्गदर्शन संपन्न


महादरबार न्यूज नेटवर्क -
शहरातील विविध शाळेत दि. १२ ऑगस्ट २०२५ रोजी मा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पेरके सर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पावडे सर, नोडल अधिकारी डॉ. हनुमंत पाटील सर, यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय अधिक्षक डॉ.वेणुगोपाल पंडित  यांच्या निरीक्षणाखाली अंगदान जीवन-संजीवनी अभियान अवयवदान  पंधरवाडा ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट कालावधी अंतर्गत ग्रामीण रुग्णालय धर्माबाद चे एनसीडी समुपदेशक नितीन आडे यांनी. जि.प.हा.धर्माबाद, शासकीय अध्यापक विद्यालय, व विस्डम इंग्लिश स्कूल येथे भेट देऊन सर्व शिक्षकवर्ग, व मुलांना अंगदान जीवन-संजीवनी अभियान या बद्दल अववयदान म्हणजे मरणानंतर ही माणुसकी जिवंत ठेवण्याचा मार्ग निर्णय एक प्राण वाचतील अनेक रस्ते दुर्घटना किंवा इतर अपघातामध्ये मेंदू मृत्यू म्हणजेच ब्रेन डेड रुग्णांचे नातेवाईक सुद्धा रुग्णाच्या मृत्यु पश्चात अवयवदानाचे निर्णय घेऊ शकतात, किडनी लिव्हर , हृदय डोळे, त्वचा अनेक अवयव दान करता येतात सोडा बंध अंधश्रदेचे फुलवा आयुष्य अनेकांचे. शेवटचा आयुष्य कुणासाठी नवी सुरुवात,अवयवदानामुळे अंधांना दृष्टी, रुग्णांना आरोग्य मिळते. अंधश्रद्धेचे बंधन तोडा एक आशेचा दीप लावा, तुमचा एक होकार कुणाचं आयुष्य बदलू शकते, किडनी, लिव्हर, हृदय डोळे ,त्वचा असे अनेक अवयव मृत्युपश्चात उपयुक्त ठरू शकतात, भीती सोडा विश्वास ठेवा विज्ञानावर."मम देह: परहिताय भवतु" म्हणजेच मेल्या नंतर माझं शरीर दुसऱ्यांच्या उपयोगी , मृत्यूनंतरचे अवयवदान म्हणजे गरजूंना जीवनदान, एक अवयव एका कुटुंबाला आशा जीवनदानाची  परंपरा आपणच सुरू करूया, तुमचं एक छोटसं पाऊल कोणाच्या आयुष्यात आशेचा किरण बनू शकतो.


जगताना आपण अनेकांना मदत करतो पण मरणानंतरही कोणाला जीवन द्यायचं असेल तर अवयव दान करा. रस्ते दुर्घटना किंवा इतर अपघातामध्ये मृत्यू झालेल्या रुग्णाच्या अवयधानाचा संकल्प झाल्यास नातेवाईकांनी रुग्णालयाच्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावे किंवा ztcc सेंटरशी संपर्क साधावा. एक निर्णय अनेकांचे आयुष्य वाचू शकतो अवयवदानाचा संकल्प आजच करा. अवयवदान म्हणजे मरणानंतरही माणुसकी जीवन ठेवण्याचा मार्ग. अवयदानासाठी नोंदणी करा. www.notto.abdm.gov.in सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट शासन याविषयी उपस्थित सर्व शिक्षकांना व    विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना अवयव दान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यास सांगितले व अवयवदान प्रतिज्ञा घेण्यात आली.

यावेळी, मुख्याध्यापक रामलोड मॅडम , अध्यापक विद्यालयाचे प्रा.विजयालक्ष्मी चापलवार , विस्डम विद्यालय चे प्राचार्य जाधव सर, सर्व शिक्षक वर्ग व ग्रामीण रुग्णालय धर्माबाद एनसीडी समुपदेशक नितीन आडे ,आरकेएसके समुपदेशक विकास आगळे, आयसीटीसी समुपदेशक निलेश जाधव, आरोग्य मित्र उमरे व १०२ चे पायलट किरणसिंह गौर, लखन कांबळे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments