महादरबार न्यूज नेटवर्क -
अक्षय शिक्षण संस्था, नातेपुते घुगरदरे प्रशाला प्राथमिक, माध्यमिक, ज्युनिअर कॉलेज नातेपुते येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सौ. रेश्मादिदी नंदकिशोर धालपे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी संस्था सभापती हनुमंतराव धालपे, ज्येष्ठ व्यापारी माणिकराव उराडे, स्नेहल घुगरदरे, काव्यांजली धालपे, मुख्याध्यापक सौ. स्मिता आवळे यांच्यासह पालक, सेवकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात ध्वजवंदना, राष्ट्रगीत, ध्वजगीत, महाराष्ट्र गीत व संविधान प्रतिज्ञेने झाली. त्यानंतर भारतमाता प्रतिमापूजन व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी रेश्मादिदी धालपे यांनी शहीद जवान कष्टकरी शेतकरी यांच्या योगदानातून घडलेल्या आत्मनिर्भर भारताचा गौरव सांगितला. तसेच शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे देश प्रगतीपथावर असल्याचे नमूद केले. स्वातंत्र्य दिन, संत ज्ञानेश्वर माऊली जन्मोत्सव आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने भारतीय संस्कृतीतील एकता, समरसता आणि उच्च ध्येय साध्य करण्याची शिकवण त्यांनी मांडली कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सुखदेव वलेकर यांनी केले. स्काऊट, आर.एस.पी. गणवेशातील विद्यार्थ्यांनी आकर्षक मानवंदना सादर केली.
0 Comments