महादरबार न्यूज नेटवर्क - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पुणे शहरातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी संदीप नाईकरे पाटील यांची नियुक्ती केली आहे. प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती जाहीर झाली असून, नाईकरे यांना पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. यानिमित्ताने आळंदी येथील कार्यकर्ते नागरिकांकडून त्यांचे जोरदार अभिनंदन केले जात आहे. नाईकरे पाटील यांनी यापूर्वी पक्षासाठी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या असून, त्यांच्या नियुक्तीमुळे कसबा पेठ मतदारसंघात काँग्रेस पक्षाची ताकद वाढण्याची अपेक्षा आहे. या नियुक्तीमुळे पक्षाच्या कार्याला नवी गती मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या सार्थ निवडीमुळे पुण्यासह आळंदी व परिसरात यांचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.
0 Comments