Hot Posts

6/recent/ticker-posts

#Alandi बाप्पाला निरोप देताना चिमुकल्यांना अश्रू अनावर


महादरबार न्यूज नेटवर्क -
घरातील बाप्पांच्या उत्सवात तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात, बाल मित्र मंडळात लहान मुले फार उत्साहात सहभागी होत असतात.

पूजाअर्चा,आरती,सजावट इ.सहभागी होतात.लहानग्यांचे १० दिवस अगदी आनंदात जातात.मात्र गणेश विसर्जनाच्या दिवशी लहानग्यांना अश्रू अनावर होतात.

आळंदीत सिध्दबेट पुला जवळील संकलन केंद्रावर एक चिमुकली गणेश मूर्ती विसर्जना वेळी बाप्पाच्या चरणा जवळ डोके ठेवत अक्षरशः हुंदके देत रडत बसली होती.वडील तिची समजूत घालत होते.आपण नवीन मूर्ती आणू, तरीही ती चिमुकली रडताना दिसत होती.कशी बशी समजूत काढून पुढे निघाले परंतु पुन्हा ती चिमकुली वडिलांच्या हाताला हिसका देत ,हात सोडवत मूर्ती संकलन केंद्रावर येऊन मूर्ती मांडीवर घेऊन रडत बसली होती( ती होती प्रीता पंकज पाखरे) .चिमुकल्यांचे बाप्पां बद्दल असलेले नाते,प्रेम ,भाव यातून दिसून आला.

त्या चिमुकलीचा रडतानाचा तो प्रसंग शरद मुरडे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

आळंदी नगरपरिषदेच्या वतीने इंद्रायणी नदी काठी ६ ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलाव केंद्रे उभारली होती.जवळपास ७५११ जणांनी मूर्ती संकलन केंद्रात मूर्ती सुपूर्द केली. आळंदी नगरपरिषदेचे ८० अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत नदी प्रदूषण टाळण्यासाठी मोठी मदत केली.

Post a Comment

0 Comments