Hot Posts

6/recent/ticker-posts

#Alandi आळंदी पोलीस स्टेशनच्या गणेशाचे उत्साही वातावरणात विसर्जन


महादरबार न्यूज नेटवर्क -
पिंपरी चिंचवड आयुक्तालय अंतर्गत असणारे आळंदी देवाची पोलीस स्टेशन, येथील श्री गणेशाचे विसर्जन आज दुपारी अतिशय उत्साही वातावरणात ढोल ताशांच्या गजरात आणि विशेष म्हणजे आळंदी देवाची येथील पोलीस स्टेशन मधील सर्व अधिकारी, पदाधिकारी, महिला वर्ग यांनी एकच ड्रेस कोड परिधान करून अतिशय उत्साही वातावरणात गणरायाला ढोल ताशांच्या गजरात निरोप दिला. या मिरवणुकी दरम्यान ठीक ठिकाणी गणरायाचे तसेच आळंदी देवाची पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांचा सन्मान करण्यात आला. यात आळंदी शहर काँग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार वडगावकर, आळंदी शेअर पत्रकार संघाचे अध्यक्ष एम.डी. पाखरे, व्यापारी तरुण मंडळ, तसेच इतरांनी देखील  गणरायाचे स्वागत करण्याचा मान मिळविला.

२४ तास समाजाच्या जडणघडणीत कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी आज खऱ्या अर्थाने काही काळ खाकी वर्दीला बाजूला सारून माणुसकीचा झरा फुलविण्यात दंग झाले होते.दुपारी इंद्रायणी तेरी असणारे मूर्ती संकलन केंद्र येथे गणेशाचे विसर्जन कुंडामध्ये करण्यात आले.

Post a Comment

0 Comments