महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस
माळशिरस तालुक्यातील कुसमोड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्ष्मीनगर या शाळेस कुसमोडचे माजी उपसरपंच तथा शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संजय पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून घसरगुंडी व सि साॅ ह्या दोन क्रिडा साहित्यासाठी दैनिक कर्मयोगी परिवाराचे प्रा.नंदकुमार लोखंडे यांच्याकडून अकरा हजार रुपये व सेवानिवृत्त मेजर जयशिव गलांडे पाच हजार रुपयांची वर्गणी शाळेला दिली. याच वर्गणीतून शाळेस क्रिडा साहीत्य उपलब्ध करून देण्यात माजी उपसरपंच संजय पाटील यांचा मोलाचा सहभाग होता.या दोन्ही साहित्याचे नुकतेच जिल्हा परिषद लक्ष्मीनगर शाळा येथे माजी उपसरपंच तथा शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशीकांत घड्याळे,उपाध्यक्षा अनिता लवटे,माजी उपसरपंच स्वाती मदने,संजय मदने,नंदकुमार पाटील, ज्ञानेश्वर मदने,राहुल मदने,व्यकु पवार, मुख्याध्यापक सुहास कोल्हे, सहशिक्षक सुनील डुरे,अंगणवाडी सेविका सत्यभामा मदने,मदतनीस सरगर मॅडम तसेच विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संजय पाटील यांनी या भागातील सर्व सामान्य कुटुंबातील मुलांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून माझे वडील स्व ज्ञानेश्वर पाटील यांनी शाळेसाठी दहा गुंठे जागा बक्षीसपञ दिली.त्यांनी शाळा सुधारण्यासाठी खुप प्रयत्न केले.यानंतर ती जबाबदारी स्विकारली असुन आजी ,माजी ,विद्यार्थी, ग्रामस्थ ,पालक व समाजातील विविध घटकातील मान्यवरांना बरोबर घेऊन शाळेचा गुणवत्ता,भौतिक सुविधा या सर्व बाबींवर लक्ष देऊन ही एक आदर्श शाळा बनविण्याचा माझा संकल्प असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
0 Comments