#Malshiras:तरंगफळ येथे विविध कार्यक्रमाने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
महादरबार न्यूज नेटवर्क -
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ग्रामपंचायत मधील प्रतिमेला सरपंच सौ पदमीनी नारायण तरंगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक ग्रामपंचायत मधील दोन कर्तबगार सामाजिक महिला कार्यकर्त्यां यांना पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रधान करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी श्री संतोष पानसरे भाऊसो, उपसरपंच पांडुरंग कांबळे, सदस्य जगुबाई जानकर, अश्विनी बोडरे, राघूबाई तरंगे, जयश्री तरंगे, भगवान तरंगे, रावसाहेब कांबळे, नारायण तरंगे,विक्रम बागाव, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेविका, गावातील जेष्ठ नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर, कार्यावर नागनाथ साळवे यांनी मार्गदर्शन केले.
यानंतर अनेक नागरी सत्कार करण्यात आले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार
श्रीमती जगुबाई मारुती जानकर
श्रीमती मनीषा रामचंद्र गेंड
ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने काही सत्कार करण्यात आले.
सुजाता सावळा कांबळे (मुंबई पोलीस), प्रियांका नामदेव तरंगे (रत्नागिरी पोलीस),चंद्रकांत सदाशिव कांबळे (विद्युत सेवक),प्रणाली दादासो बागाव (HSC प्रथम क्रमांक),रणजित दादासो काळे ( IIT रुडकी उत्तराखंड, प्रथम श्रेणी), मधुकर आप्पा नरळे ( एस टी महामंडळ निवृत्त कर्मचारी)आणि नागनाथ संपत साळवे- कला ,सामाजिक प्रबोधन कार्यात उत्कृष्ट कामगिरी. अश्या अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, जयंती मोठ्या उत्साहात पार पडली.
Comments
Post a Comment