#Natepute:धर्मवीर आनंद दिघे उद्यानासाठी दोन कोटी निधी सह विविध विकास कामांची हिवरकर पाटील यांची मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे मागणी




महादरबार न्यूज नेटवर्क -
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे  यांच्याकडे माळशिरस तालुक्यातील विविध विकास कामांसाठी निधी मिळावा यासाठी आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत  व जिल्ह्याचे संपर्कप्रमुख तथा शिवसेनेचे नेते शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस  शिवसेना तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी माळशिरस तालुका शिवसेनेच्या वतीने मुंबई मंत्रालयात जाऊन निवेदन देण्यात आले.

निवेदनात नातेपुते नगरपंचायत हद्दीत धर्मवीर आनंद दिघे उद्यानासाठी २ कोटी रुपयांचा निधी, माळशिरस येथील तालुका कृषी  कार्यालय इमारत बांधण्यासाठी २ कोटी, फडतरी रोड कॅनॉल चौकी ते चिंधादेवी नातेपुते शिंगणापूर रस्ता  शंभू महादेव कावड रस्ता सुधारणा करणे ०-०० ते २किमी अंदाज रक्कम ८०  लक्ष, दहीगाव कुरबावी रस्ता ते ५२ चाळ ०० ते ३_००की .मी सुधारणा करणे अंदाजे रक्कम ६० लाख रुपये, नातेपुते फोंडशिरस रस्ता राऊत वस्ती फाटा क्रमांक ४६ लगतचा रस्ता सुधारणा करणे ०-० ते २-००किमी अंदाजीत रक्कम ४० लक्ष, दहिगाव फोंडशिरस रोड ते गोरे वस्ती रस्ता सुधारणा करणे ०-०ते १.५००कि मी.अंदाजे रक्कम २० लक्ष, नातेपुते फोंडशिरस रस्ता ते रस्ता राऊत वस्ती पांढरे वस्ती शिंदे वस्ती सुधारणा करणे अंदाजित रक्कम ४०लक्ष,पळस मंडळ खोरोची बंधारा ते मोठेवाडी रस्ता सुधारणा करणे ०-०ते ३-०० किमी अंदाजीत रक्कम ७० लक्ष, गुरसाळे भरत गायकवाड घर ते पत्रकार विलास भोसले घर ०-००  ते १-००किमी  अंदाजित रक्कम ४० लक्ष रुपये निधीची मागणी केली त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिली असल्याचे हिवरकर पाटील यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत