महादरबार न्यूज नेटवर्क -
इयत्ता दहावी नंतर पुढे काय असा अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ असतो. नक्की कोणत्या बाजूला आपण जायचं आणि आपल्या आवडीनिवडीनुसार आपण आपल्या क्षेत्रात काम करून मिळणाऱ्या संधी याबाबत मार्गदर्शनाची गरज असते. अशावेळी चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड ने पुढाकार घेऊन बारामतीच्या एमआयडीसी शाखेमध्ये विद्यार्थी आणि पालकांसाठी मोफत मार्गदर्शनाचे शिबिर आयोजित केले होते. यावेळी अनेक विद्यार्थी व पालक उपस्थित होते. सृजन सोशल वेल्फेअर फाउंडेशनचे प्रा.विशाल भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
स्पर्धेच्या युगात स्वतःला आवडीनुसार झोकून देण्यासाठी स्वतःची क्षेत्रे स्वतःच निर्माण केली पाहिजेत. आणि मिळणाऱ्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे, असे विचार देखील त्यांनी व्यक्त केले. यावेळी एसबीआय बँकेच्या वतीने श्री मुल्ला सर व सौ मोरे मॅडम यादेखील उपस्थित होत्या. श्री प्राध्यापक प्रफुल्ल आवाडे यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा महामंत्रच दिला.
सदर कार्यक्रमासाठी चंदुकाका सराफचे चेअरमन किशोर कुमार शहा,बारामती क्लस्टर हेड श्री दीपक वाबळे, श्री.अमोल पात्रे,श्री कुमार राठोड, एमआयडीसी शाखाप्रमुख श्री.राहुल घोरपडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय माने यांनी केले.
0 Comments