#Yavat:कत्तलीला नेणाऱ्या मुक्या गाईची सुटका
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड येथील कत्तलखान्यावर छापा टाकून १६ जनावरांची पोलीस आणि प्राणिमित्रांनी सुटका केली. जनावरांच्या चरबीपासून बनविलेले भेसळ तूप आणि जनावरांची कातडी जप्त केली. दौंड येथे ईदगाह मैदान शेजारी खाटीक गल्लीतील कत्तलखान्याशेजारी जनावरे गोवंश कत्तलीसाठी ठेवले आहेत, अशी माहिती प्राणिमित्रांना मिळाली. त्यांनी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना ही माहिती दिली.
प्राणिमित्र अधिकारी शादाब मुलाणी, मंगेश चिमकर, निखिल दरेकर, अहिरेश्वर जगताप, ओमकार जाधव, प्रेम पवार व इतर सहकारी यांनी दौंड पोलीस स्टेशनला महिती दिली. खाटीक गल्ली येथे छापा टाकण्यात आला. १६ लहान मोठी वासरे अमानुषपणे डांबून ठेवण्यात आली होती. १६ गोवंशाची सुटका करण्यात आली. जनावरांच्या चरबीपासून बनविलेले १०० किलो बनावट डालडा तुप जनावरांची कातडी जप्त केली. शरीफ हसन कुरेशी (रा. दौंड, खाटीक गल्ली) याच्याविरोधात दौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील व मानद पशुकल्याण अधिकारी महेश भंडारी यांनी विशेष सहकार्य केले. पुढील तपास अमीर शेख, रवींद्र काळे करीत आहेत.
Comments
Post a Comment