Posts

Showing posts from May, 2024

#Pune ॲड. राजेंद्र उमाप यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा राज्य अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल भारतीय पत्रकार संघ A I J. लिगल विंग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ॲड कैलास पठारे पाटील व उपाध्यक्ष महाराष्ट्र ॲड. पांडुरंग ढोरे पाटील यांच्याकडून सत्कार

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - भारतीय पत्रकार संघ लिगल विंग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ॲड कैलास विश्वनाथ पठारे पाटील,उपाध्यक्ष AIJ. लिगल विंग महाराष्ट्र राज्य ॲड पांडुरंग नारायणराव ढोरे पाटील आणि सचिव AIJ लिगल विंग महाराष्ट्र ॲड योगेश तुपे पाटील राज्य यांच्या कडून ॲड. राजेंद्र उमाप यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा राज्य अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल भारतीय पत्रकार संघ लिगल विंग महाराष्ट्र राज्य यांच्याकडून शाल,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी भारतीय पत्रकार संघ लिगल विंग टिम वकील बांधवांकडून ॲड राजेंद्र उमाप यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा राज्य नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून योग्य क्रियाशील व्यक्तीमत्वाची निवड करण्यात आली आहे.वकिलाच्या समस्यांचे निवारण करण्यात मोठा सहभाग दर्शवणारे व्यक्तीमत्व म्हणजे ॲड राजेंद्र उमाप सरच सर्व महाराष्ट्र व गोवा राज्य या ठिकाणाहून कार्यरत असून भविष्यात त्यांच्या माध्यमातून वकील वर्गाची अधिक अधिक कार्य होत राहो हिच शुभेच्छा उपस्थित भारतीय पत्रकार संघ लिगल विंग टिम वकील बंधू भग

#Baramati चंदुकाका सराफ एमआयडीसी शाखेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - १९८ वर्षांची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या मूळ बारामतीचे असलेले सुवर्णपेढीच्या अनेक शाखा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. बारामतीचा शुद्ध सोना अशी ओळख असलेल्या या सुवर्णपेढीच्या माध्यमातून आज असंख्य ग्राहक जोडले गेलेले असून ही सुवर्णपेढी व विश्वासास पात्र ठरलेली आहे. नावीन्यता, शुद्धता, विश्वासार्हता, पारदर्शकता या बळावरती आज ही सुवर्णपेढी काम करत आहे. एमआयडीसी शाखेचा सातवा वर्धापन दिनचंदुकाका सराफ एमआयडीसी शाखेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा. १९८ वर्षांची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या मूळ बारामतीचे असलेले सुवर्णपेढीच्या अनेक शाखा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. बारामतीचे शुद्ध सोनं अशी ओळख असलेल्या या सुवर्णपेढीच्या माध्यमातून आज असंख्य ग्राहक जोडले गेलेले असून ही सुवर्णपेढी व विश्वासास पात्र ठरलेली आहे. नावीन्यता, शुद्धता, विश्वासार्हता, पारदर्शकता या बळावरती आज ही सुवर्णपेढी काम करत आहे. एमआयडीसी शाखेचा सातवा वर्धापन दिन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. वर्धापन दिनाचे औचित्य सांगून शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले ह

#Malshiras ओम सचिन गाटे याचे सिबीएसई दहावीच्या परीक्षेत दैदीप्यमान यश

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील  ओम सचिन गाटे  याने सिबीएस ई  दहावीच्या परीक्षेत दैदीप्यमान यश संपादन केले. त्याने ९७.२० टक्के गुण मिळवित सातारा येथील  सैनीक स्कुलमध्ये प्रथम क्रमांक संपादन केला.त्याने गणीत व समाजशास्त्र विषयात १०० पैकी १०० गुण मिळविले. पिलीव सारख्या  ग्रामीण भागातुन  जाऊन  सातारा येथील नामांकीत सैनीक स्कुलमध्ये दैदीप्यमान यश संपादन केल्याबद्दल  ओमचे सर्व क्षेत्रातील मान्यवराकडुन अभिनंदन व  कौतुक होत आहे. माळशिरस तालुका  प्राथमिक शिक्षक सोसायटी अकलुज चे संचालक सचिन गाटे यांचा तो मुलगा आहे. ओमच्या हया यशाबददल  माळशिरस पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार करडे यांनी  ओमचे विशेष अभिनंदन केले.  

#Chiplun संगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावातील ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांचे आभार व्यक्त केले

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव संगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावातील गेले पंधरा वर्षे रखडले काम, जि.प. शाळा क्र.३ ते जि. प शाळा क्र.२  चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ.शेखरजी गोविंदराव निकम सर यांनी सुमारे ६५ लाख रुपये मजुंर करून त्या रस्ताचे मजबुतीकरण व डांबरीकरण काम पूर्ण केले.तरी करजुवे गावातील ग्रामस्थांनी सावर्डे येथील कार्यालयात उपस्थित राहुन आमदार शेखरजी गोविंदराव निकम यांचे आभार मानले. यावेळी अजय चांदिवडे, पांडुरंग चांदिवडे, गोपिनाथ बाचिम, संतोष बाचिम, पांडुरंग वेलोडें, गोपाळ कांगणे, प्रकाश बाचिम, कृष्णा पाताडे, अनिल गोवळकर, सुभाष बाचिम आदी उपस्थित होते.

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - शिदेवाडी (ता. माळशिरस) येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी माता यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारदि. १४ रोजी सालंकृत महापूजा स.८वा., पुरणपोळी नैवेद्य, महिलासाठी संगीतखुर्ची,राञी ८वा. आॅर्केस्टा धूमाकूळ, बूधवार दि. १५ रोजी देवीची सार्वजनिक महापूजा, देवीचा महानैवेद्य, कुस्तीचे मैदान,गूरूवार दि.१६ रोजी सकाळी सहा वाजता छबिना व देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात  येणार असल्याचे श्री लक्ष्मीआई यात्रा समाजसेवा न्यास शिंदेवाडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

#Malshiras माळशिरस पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उपद्रवी इसमाविरुद्ध प्रतिबंधक कारवाई

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - माळशिरस पोलीस स्टेशन पोलिसांची कारवाई दिनांक  ७ में २०२४ रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माळशिरस पोलीस स्टेशन हद्दीत सर्व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्याच्या दृष्टिकोनातून माळशिरस पोलिसांनी एकूण ६०४ उपद्रवी इसमा विरूद्ध प्रतिबंधक कारवाई केली आहे. त्यामध्ये सीआरपीसी १४४ प्रमाणे ७० इसमाना हद्दपार करण्याचे नोटीस बजानेत आल्याआहेत. सीआरपीसी ११० प्रमाणे ज्या इसमाविरुद्ध दोन किंवा दोन पेक्षा जास्त गुन्हे आहेत असे इसमा कडून चांगले वर्तनुकीचे बाँड लिहून घेण्यात आले आहेत. तसेच ज्या इसमा विरुद्ध दारूबंदीच्या दोन किंवा दोन पेक्षा जास्त केसेस आहेत त्यांच्याकडून चांगले वर्तनुकीचे   बाँड लिहून घेण्यात आलेले आहेत तसेच काही दारू विकणारे इसम यांना हद्दपार करण्यात आले आहे. मुंबई पोलीस अधिनियम ५६ प्रमाणे काही इसमास तडीपार करण्यात आले आहे. सीआर पीसी १०७ प्रमाणे ४१५ इसमा विरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. पिलीव घाटात व जळभावी घाटात नाकाबंदी सुरू असून बारकाईने वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे तसेच दोन भरारी पथके तयार करून आचारसंहितेच्या भं

#Baramati चंदुकाका सराफ मध्ये रिंग व चैन महोत्सवाला मिळणार भरपूर प्रतिसाद - सरपंच जुई हिवरकर

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - १९८ वर्षांची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या, व मूळ बारामतीची असणारी सुवर्णपेढी चंदुकाका सराफ प्रा. लि. मध्ये सध्या रिंग व चैन  महोत्सव सुरू झाला असून या महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळणार असल्याचे प्रतिपादन शिरसुफळ गावच्या सरपंच जुई हिवरकर यांनी केले. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे  सहभाग घेणारी ही सुवर्णपेढी ग्राहकांच्या आढळ विश्वासास पात्र ठरत असून रिंग व चैन महोत्सवा मध्ये उपलब्ध असणारे कलेक्शन  आपण आमच्या बारामती व एमआयडीसी शाखेत जरूर पहावे असे चंदुकाका सराफ प्रा.लि.संचालिका सौ नेहा किशोरकुमार शहा यांनी केले. यावेळी महाराष्ट्र राज्य चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर बारामती विभागाचे उपाध्यक्ष श्री शिवाजी निंबाळकर व सौ भाग्यश्री निंबाळकर डॉक्टर नवनाथ मलगुंडे लेखक शेखर हुलगे बांधकाम व्यावसायिक विश्वास जगताप व स्नेहलता जगताप उपस्थित होते. तसेच या शाखेचे शाखाप्रमुख रोहित आवदे, नवनाथ गिऱ्हे,अश्विनीकुमार पत्की, कुलदीप जगताप उपस्थित होते.सदरील उद्घाटनासाठी दीपक वाबळे, कु

#Yavat शॉर्टसर्किटमुळे एक एकर ऊसाला आग ,शेतकऱ्याची नुकसान भरपाईची मागणी

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दौंड तालुक्यातील राहू गावच्या नजिक विद्युत शॉर्टसर्किटमुळे एक एकर ऊसाला आग लागल्याची घटना दि २८ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान घडली. आगीमुळे संबंधित शेतकऱ्याचे दिड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटची सविस्तर माहिती अशी आहे की, राहू गावच्या हद्दीत सुवर्णा सिद्धार्थ भालेराव यांनी शेत जमीन गट क्रमांक ८५४ मध्ये एक एकरामध्ये ऊसाचे पीक घेतले असून हा ऊस तेरा महिन्यांचा झाला होता. या ऊसाच्या शेतावरून महावितरणची वीजपुरवठा करणारी मुख्य लाईन गेली आहे. या लाईनची एक तार तुटून ऊसाच्या शेतात पडल्यामुळे ऊसाला आग लागली. सध्या उन्हाचा पारा वाढत  गेला असताना लागलेली आग अधिकच भडकून एक ऊस पूर्णतः जळाला. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याचे अंदाजे दिड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच शेजारी असलेल्या विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या केबल जळून देखील नुकसान झाले. महावितरणच्या शेतावरून गेलेल्या मुख्य लाईनची विद्युत तार ऊसाच्या शेतात पडून ऊसाला आग लागून नुकसान झाल्यामुळे महावितरण विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी संबंधित शेतकऱ्याने केली आहे.