Posts

Showing posts from March, 2022

#Natepute:तेजस्विनी मोरे रत्नाई पुरस्काराने सन्मानित

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोंढे वस्ती  कारूंडे  येथील मुख्याध्यापिका  तेजस्विनी मोरे मॅडम यांना शिक्षक संघ तालुका माळशिरस यांच्या वतीने रत्नाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तेजस्विनी मोरे यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याची दखल घेत अकलूज येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला. रत्नाई पुरस्कार मिळाल्याने शाळेच्या वतीने तसेच ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

#Chiplun:माखजन इंग्लिश स्कूल माखजन माजी विद्यार्थी ' स्पंदन २०००- २००१ स्नेहमेळावा उत्साहात साजरा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव होळीचा सण म्हटला की कोकणवासीयांसाठी आनंदाची पर्वणी तर असतेच परंतु चाकरमान्यांसाठी एकत्र येऊन माजी विद्यार्थी मित्र-मैत्रिणीत रममाण होऊन सण साजरा करत जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे एक निमित्त असते. नाही म्हणायला गणपती, दिवाळी या निमित्ताने कोकणवासीय एकत्र येतच असतात परंतु होळी आणि धुलीवंदनाची मजा काही औरच असते. या सणांदिवशी देवी देवतांची यात्राही असते शिवाय मित्र-मैत्रिणींसोबत रंग खेळताना लहानपणीच्या आठवणीही जागृत होतात.       अशाच काहीशा लहानपणीच्या आठवणी जागवत गावापासून दूर पुणे-मुंबई, कोल्हापुर सारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये कामानिमित्त गेलेल्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन मधील माजी विद्यार्थीनी नुकताच स्पंदन २०००-२००१ रि-युनियन हा बालपणीच्या आठवणींना उजाळा देणारा एक छोटासा स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम धामणी येथील राई  रीसाॅर्ट येथे आयोजित केला होता.       यावेळी प्रत्येकाने शाळा-कॉलेज पूर्ण केल्यानंतर आत्ता कोण-कोण, काय-काय काम करत आहे हे जाणून घेत प्रत्येकाच्या कौटुंबिक स्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी बालपणीचे काही खेळ खेळत संगीताच्

#Natepute:महाराष्ट्र नवनिर्माण सेना नातेपुते शहर प्रभाग शाखेचे उद्घाटन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - महाराष्ट्र नवनिर्माण सेना नातेपुते शहर प्रभाग क्रमांक ८ महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे नेते माननीय दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन संपन्न झाले. संयोजक मनसे माळशिरस तालुका उपाध्यक्ष प्रदिप ऊर्फ बाबा ननवरे  यावेळी उपस्थित मान्यवर मनसे मा. जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे , मनसे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे ,  मनसे जिल्हा सरचिटणीस आकाश होनमाने, मनसे तालुकाध्यक्ष सुरेश टेळे , मंगल ताई चव्हाण मनसे महिला आघाडी तालुकाध्यक्ष मनसे माळशिरस विधानसभा अध्यक्ष कुंडलिक मगर, मनसे मार्गदर्शक संतोष देवकते, मनसे माळशिरस तालुका सचिव लक्ष्मण नरुटे,  मनसे तालुका प्रसिद्धीप्रमुख फिरोज शेख , मनसे उपाध्यक्ष रोहित खाडे , मनसे  नातेपुते शहर प्रसिद्धीप्रमुख दादासाहेब भांड, विद्यार्थी तालुकाध्यक्ष प्रेम देवकाते, मनसे विद्यार्थी तालुका उपाध्यक्ष अक्षय बावकर इ.पदाधिकारी उपस्थित होते.   मनसे प्रभाग क्रमांक ८  मधील नवनियुक्त पदाधिकारी शाखाध्यक्ष राजेंद्र कांबळे शाखा उपाध्यक्ष तुषार पिसे, कार्याध्यक्ष राजेश उर्फ

#Natepute:नातेपुते पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणारी टोळी केली जेरबंद

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - नातेपुते पोलीस ठाणेचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी मोटार सायकल चोरी करणारी चोरांची टोळी जेरबंद करुन त्यांचेकडुन ६,२५,००० / - रुपये किंमतीच्या एकूण ० ९ मोटार सायकली केल्या जप्त. नातेपुते पोलीस ठाणे गुरनं ७३ / २०२२ भादंवि कलम ३७९ प्रमाणे दिनांक ०२/०३/२०२२ रोजी दाखल असून सदर गुन्हयाचे तपासकामी  डॉ . बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी , अकलुज विभाग , अकलुज व नातेपुते पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी हे तपास करीत असताना नातेपुते पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी गोपणीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की , मौजे मांडवे गावातील पुणे पंढरपुर रोडवर अहिल्याचौक येथे दोन मुले संशयितरित्या बुलेट मोटारसायकलवर फिरत आहेत . अशी बातमी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे  तानाजी पवार पोलीस उप निरीक्षक व त्यांचे पथकास मिळाली , सदर दोन मुलांना ताब्यात घेवून त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केला असलचे व इतर मोटार सायकली ही त्याचे ०१ साथिद

#Yavat: उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्याची वीज खंडित केल्याने अतोनात नुकसान होत आहे - आमदार राहुल कुल

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप थकीत वीजबिलापोटी राज्यातील शेतकर्‍यांच्या कृषीपंपाची वीज बेधडकपणे खंडित करण्याचा सपाटा महावितरणने लावला आहे, अतिवृष्टी,अवर्षण आदींनी राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत असतानाच ऐन उन्हाळामध्ये शेतकऱ्याची वीज खंडित केल्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होत आहे, शेतीपंपांची अवास्तव बिल आकारणी, लाखो रुपयांची थकबाकीची बिले देऊन सक्तीच्या वीज बिल वसुलीने बळीराजाचा अडचणीत येत आहे.  या संदर्भात विरोधी पक्ष नेते माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब व भारतीय जनता पार्टीच्या इतर विधानमंडळ सदस्यांनी सभागृहात लक्षवेधी उपस्थित केली परंतु शेतकर्‍यांच्या कृषी पंपाची वीज तोडणी मोहीम थांबविण्याबाबत व शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिला संदर्भात कुठलाही ठोस उपाय, दिलासा न देणाऱ्या जुलमी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आमचे नेते  माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात विधानभवन परिसरात निदर्शने करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.

#Natepute:दलित महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीसपदी सचिन रणदिवे यांची निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - नातेपुते येथे दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.मच्छिंद्रजी सकटे यांच्याहस्ते सचिन रणदिवे यांची दलित महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस पदी निवड करण्यात आली.  यावेळी उपस्थित दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष केरबा लांडगे, तालुका उपाध्यक्ष संपत खिलारे, संतोष लांडगे, रोहिदास लांडगे रणवीर लांडगे विकी अवघडे तसेच अधिक कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आज पर्यंत सामाजिक क्षेत्रात तसेच पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या कार्याची नोंद घेऊन दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी त्यांना दलित महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस पदाची जबाबदारी दिलेले आहे त्यांच्या या निवडीने त्याच्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

#Pune:भारतीय पत्रकार संघ(AIJ) महाराष्ट्र लीगल विंग च्या चेअरमन पदी ॲड. कैलास पठारे पाटील यांची निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - भारतीय पत्रकार संघाच्या महाराष्ट्र लीगल विंगच्या चेअरमनपदी पुण्याचे अॅड. कैलास पठारे पाटील यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सेन यांच्या निर्देशनानुसार तसेच संघटन मंत्री विनोद सोलंकी व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एम एस शेख , संघटक अनिल सोनवणे तसेच महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष पल्लवी नंदुरबार यांच्या सहमतीने राष्ट्रीय मुख्य महासचिव पंडित मनोहर मंडलोई यांच्या हस्ते ॲड.श्री कैलास पठारे पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले आहे. भारतीय पत्रकार संघाच्या माध्यमातून कैलास पठारे पाटील यांनी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात पत्रकारांच्या हितासाठी भरीव योगदान दिल्याबद्दल त्यांची महाराष्ट्र प्रदेश लीगल विंगच्या चेअरमन पदी निवड करण्यात आली आहे. यावेळी ॲड. कैलासजी पठारे पाटील यांच्या निवडीबद्दल पत्रकार संघाचे  कायदेविषयक  सल्लागार अँड  पांडुरंग ढोरे पाटील,अँड  योगेश तुपे, पुणे जिल्हाध्यक्ष रमेश लेंडे,  सोलापूर जिल्हा अध्यक्ष लतीफभाई नदाफ,तसेच माळशिरस तालुक्यातील  पत्रकार संघ पदाधिकारी व सदस्य,  सांगली जिल्हाध्यक्ष प्रसाद कडव या

#Malshiras:स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा वेळापुरात रास्ता रोको

Image
वेळापूर -सांगोला मार्ग ३ तास धरला रोखून महादरबार न्यूज नेटवर्क - शोभा वाघमोडे सक्तीची वीज वसुली थांबवावी, शेतीला दिवसा वीज पुरवठा करावा व तोडलेली वीज कनेक्शन पूर्ववत करावी या प्रमुख मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी धरणे आंदोलन सुरू केले असून या बेमुदत धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर व स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षाचे माढा लोकसभा अध्यक्ष कमलाकर देशमुख  यांच्या नेतृत्वाखाली वेळापूर ता माळशिरस येथे वेळापूर- सांगोला हा महामार्ग स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिलेदारांनी तीन तास रोखून धरल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या वेळापूर पोलीस स्टेशन व अर्धनारीनटेश्वर मंदिराच्या समोर स्वाभिमानीच्या शिलेदारांनी हा रस्ता रोको केला होता या वेळी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा दिल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली यावेळी महावितरणचे अधिकारी मोटे यांनी शेतकऱ्यांना पाच तास वीज पुरवठा करतो असे आश्वासन दिल्याने स्वाभिमानीचे शिले

#Malshiras:महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा वर्धापन दिन आरोग्य शिबिराने साजरा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - सन्मा राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व पक्षनेते दिलीपबापु धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुका उपाध्यक्ष रोहित खाडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना  गट नं.२ शाखेचा पहिल्या वर्धापन दिनानिमित्त २ दिवसाचे आरोग्य शिबिर  आयोजित केले होते. यात महिलांसाठी हिमोग्लोबिन , सर्व प्रकारच्या रक्तातील टेस्ट , मोफत ई- श्रम कार्ड शिबिर ,  तसेच डाँ. सागर निटवे ( MD ) यांच्यामार्फत मोफत पाईल्स , मुतखडा ,यांच्य तपासणी तसेच , पुणे येथिल सुप्रसिद्ध H.P देसाई हाँस्पिटल यांच्या मार्फत मोतिबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी शिबीर आयोजित केलते या शिबिरास गावकऱ्यांनी उस्फुर्त असा प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे उद्धाटन सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे , महाळुंग नगरपंचायत चे नगरसेवक नानासो मुंडफणे , माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे , माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेश टेळे , सचिव लक्ष्मण नरुटे ,यांच्या हस्ते झाले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाखा प्रमुख आकाश शिंदे राजेंद्र भोसले , रामा धंगेकर , अनिल कांबळे , हनुमंत कांबळे , पृथ्वीराज इं