#Natepute:आरोग्य विभागात आरोग्य सेवेसाठी राजकुमार हिवरकर पाटील यांचे मोलाचे योगदान : डॉ.एम.पी. मोरे
महादरबार न्यूज नेटवर्क - मिनिस्ट्री पासून ते खालच्या पर्यंत आरोग्य विभागाकडे आत्तापर्यंत कोणीही लक्ष दिले नाही. बजेट देतानाही कमी बजेट दिले जाते. तसे पाहिले तर आरोग्य विभाग सगळ्यात महत्त्वाचा विभाग मानला जातो हिवरकर पाटील यांनी ग्रामीण रुग्णालयात लक्ष घातल्यापासून येथील सुधारणा झालेल्या दिसतात. महिन्याला दहा ते बारा सिजर होतात. बाहेर या सिजरला तीस ते चाळीस हजार रुपये जातात मात्र हे सिजर ग्रामीण रुग्णालयात मोफत होत असल्याचे मत माजी वैद्यकीय अधिकारी डॉ.एम.पी. मोरे यांनी व्यक्त केले. ते नातेपुते येथे महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज व महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयात एक कोटी निधीच्या अत्याधुनिक ऑपरेशन थेअटरच्या लोकार्पण सोहळा व बचत गटातील महिला, बांधकाम कामगार यांची मोफत तपासणी शिबिराप्रसंगी बोलत होते. यावेळी पुढे बोलत असताना डॉ.एम.पी. मोरे म्हणाले की, आरोग्य मंत्री पदचा पदभार स्वीकारल्यानंतर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयाला पहिली भेट दिली. त्यावेळेस आम्हाला वाटले ते येतील पाहणी करत