#Chiplun:दिनदयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व चिपळूण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान (DAY-NULM), चिपळूण नगर परिषद, चिपळूण अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या बचत गट, वस्तीस्तर संघ, शहर स्तर संघ यांचे करीता लिंग-आधारित हिंसेबाबत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. केंद्र व राज्य शासनाच्या लिंग आधारित भेदभाव आणि हिंसा समाप्त करण्याच्या नयी चेतना : पहल बदल की या करीता दि. १५ नोव्हेंबर २०२२ ते २३ डिसेंबर २०२२ या कालावधीत राबविण्यात आला, या अंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान (DAY-NULM), चिपळूण नगर परिषद, चिपळूण मार्फत खालील प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत सौ. दिक्षा दिपक माने, सहयोगीनी, माविम व श्रीम. प्रज्ञा दिपक गमरे, समुदाय संघटक यांनी केले. १) कार्यशाळा : मा. बाळासाहेब ठाकरे शॉपींग सेंटर (L टाईप शॉपिंग सेंटर), मार्कंडी, चिपळूण येथे कार्यशाळा घेण्यात आली. लिंग-आधारित हिंसेबाबत आधारीत लिंग -आधारित हिंसा, POSH कायदा, या बाबत ॲड. स्मिता कदम यांनी मार्गदर्शन केले, तसेच लिंग समानता या विषयी श्री.अशफाक गारदी,