#Solapur:महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमातूनपीडितेला तातडीने न्याय देण्याची भूमिका- अध्यक्षा रूपाली चाकणकर
जनसुनावणीत 81 थेट तक्रारी प्राप्त सोलापूर , दि. 29 ( जि. मा. का.) : ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमातून वर्षानुवर्षे अत्याचार, अन्यायग्रस्त पीडितेला स्थानिक पातळीवर तातडीने न्याय देण्याची आयोगाची भूमिका असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज येथे केले. ‘महिला आयोग आपल्या दारी’ या जनसुनावणीदरम्यान आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. नियोजन भवन सभागृहात आयोजित या कार्यक्रमास पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव नरेंद्र जोशी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. विजय खोमणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( महिला व बालकल्याण) जिल्हा परिषद जावेद शेख , तहसीलदार अंजली मरोड आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. राज्याच्या विकासाचा आलेख महिलांच्या सुरक्षिततेवर मोजला जातो. त्यामुळे महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांची सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे, असे सांगून रूपाली चाकणकर म्हणाल्या, कौटुंबिक हिंसाचार