Posts

Showing posts from February, 2023

#Natepute:ग्रामीण भागातील मूलांनी शासकीय सेवेत येण्यासाठी एस.एन.डी.करीअर अकॅडमी उत्कृष्ट काम करेल - बसवराज शिवपूजे

Image
महादरबार न्यूज नेटवर्क : - नातेपुते तालुका माळशिरस येथील एस.एन.डी.करीअर अकॅडमी उद्घाटन प्रसंगी बोलताना अकलूजचे उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपूजे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष उत्कषाराणी पलंगे होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलन करून  स्कूलमधील मूलींनी स्वागतगीत व, महाराष्ट गीत सादर केले. पुढे बोलताना शिवपूजे म्हणाले,ग्रामीण भागातील मूलांना शहरी भागातील कोर्सेस समजत नाहित तसेच शहरी भागात गरीब मूलांना आर्थिक परीस्थितीचा सामना करावा लागतो.दहावी बारावी,या शैक्षणिक वर्षातच योग्य मार्गदर्शन मिळाल्यास मूलांना यश मिळविण्यासाठी अडचण येणार नाहि.स्पर्धेच्या यूगात पूणे,मूंबई,दिल्ली,हैद्राबाद. या ठिकाणी जाण्यास गरीब मूला मूलींना खर्च परवडण्यासारखा नसतो ,याठिकाणी ग्रामीण भागात हि सोय झाल्याने मूले शासकीस सेवैत जातील. प्रास्ताविक करताना चेअरमन मालोजीराजे देशमूख म्हणाले,समाजभूषण नानासाहेब देशमूख एज्यूकेशन सोसायटीचे एस.एन.डी. करीअर अॅकॅडमी सूरू करत आहोत ,समाजभूषण नानासाहेब देशमूख याच्या आदर्शाने,विचारानै आ

#Natepute:चंद्रप्रभू स्कूल मध्ये ऐतिहासिक वेशभूषेत "शिवजन्मोत्सव" साजरा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  -   चंद्रप्रभू इंग्लिश मेडीयम स्कूल नातेपुते याठिकाणी "शिवजयंती" ऐतिहासिक आणि पारंपारिक वेशभूषेत मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमास इतिहास अभ्यासक व  नातेपुते केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. प्रशांतजी सरुडकर सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. वर्धमानजी दोशी उपस्थीत होते. यावेळी  डॉ्. उदयकुमार दोशी, मुख्यध्यापिका शितल ढोपे मॅडम, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते. शिवजयंती निमित्ताने सर्व विद्यार्थी पारंपारिक वेशभूषा परिधान करून आले होते. प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे आणि नवीन शंभर पुस्तकांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर धिरेन ननवरे, अर्पित व्होरा, श्रेया कर्चे, सृष्टी लोणारी, उजाला कर्चे या विद्यार्थ्यानी शिवरायांच्या पराक्रमावर उत्कृष्ट भाषणे केली. तर मैत्री भगत, साईज्ञा सोलंकर, ईशिता महामुनी, गौरी धालपे, वृंदावनी लाळगे, जान्हवी काळे, श्रेया करचे यांनी "प

#Natepute:जिल्हास्तरीय पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम जनजागृती मेळावा संपन्न

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  -   महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ,जिल्हा कार्यालय सोलापूर यांच्यामार्फत जिल्हास्तरीय पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम जनजागृती मेळावा गुरुवार दि.२३ फेब्रुवारी २०२३ रोजी नातेपुते शहरात आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला माळशिरस तालुक्यातील व शेजारी तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यात महिलांचा तसेच युवक वर्ग सहभाग हे या लक्षवेदी ठरले.या कार्यक्रमासाठी नातेपुते नगरपंचायत नातेपुते यांचे विशेष सहकार्य मिळाले. माळशिरस तालुक्यातील सोलापूर जिल्हाचे शेवटचे शहर नातेपुते जे सोलापूर पासून १५० किलोमीटर अंतरावर असून जिल्हा शासकीय कार्यालय शासकीय योजनापासून दूर राहतात यांना योजनेची माहिती होण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ जिल्हा कार्यालय सोलापूर यांच्यामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम जनजागृती मेळावा संपन्न झाला.या मेळाव्यात बँक,यशस्वी उद्योगजक तसेच मंडळाचे अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे  जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी ध्रुवकुमार बनसोडे

#Baramati:जैनकवाडी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  -   जागृती माने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठया उत्साहात साजरी झाली आहे. ज्यांच्या कीर्तीचा निनाद तीनशे पन्नास वर्षांनंतरही उभ्या जगात केला जातोय असा तमाम, रयतेच्या वाट्याला आलेल एक सत्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कोविड नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी प्रमाणे सगळीकडेच साजरी केली जाते.मात्र यावर्षी जैनकवाडी  गावातील या माहिलानी शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूक काढून मोठ्या उत्सवाने साजरी केली पहिला मिळाली आहे.      या ठिकाणी गावातील अनेक महिलांचा यामध्ये सहभाग होता. यावेळी बारामती तालुक्यातील जैनकवडी या गावातील महिलांनी अगदी पारंपरिक पद्धतीने दिंडी काढली त्याचबरोबर लहान मुलांनी देखील यावेळी पोवाडे सादर करत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली.         या संपूर्ण  कार्यक्रमाचे आयाेजण शुभांगी पवार यांनी केले होते. यावेळी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन गावाच्या पोलीस पाटील साक्षी मिंड याच्यां हस्ते करण्यात आले. व त्यांनी  छत्रपती शिवराय याचे विचार आपन मनामनामध्ये रूजवाय

#Natepte:विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत भविष्य घडवण्यासाठी नातेपुते येथे एस.एन.डी करिअर अकॅडमीचे उद्घाटन

Image
महादरबार न्यूज नेटवर्क   - शनिवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी नातेपुते येथील एस एन डी इंटरनॅशनल स्कूल येथे सायंकाळी सहा वाजता एस.एन.डी. करिअर अकॅडमीचे उद्घाटन व एस.एन.डी. इंटरनॅशनल स्कूलचा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती स्कूलचे चेअरमन तथा नातेपुते नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख यांनी दिली. सदर करियर अकॅडमीचे उद्घाटन अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे तसेच नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा उत्कर्षाराणी पलंगे यांच्या शुभहस्ते होणार आहे. या करिअर अकॅडमी मध्ये एम.पी.एस.सी. परीक्षा मार्गदर्शन अंतर्गत कोर्सेस मध्ये गट ब पोस्टसाठी पोलीस उपनिरीक्षक, राज्यकर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी तसेच गट क पोस्टसाठी उत्पादन शुल्क निरीक्षक, लिपिक टंकलेखक मंत्रालय व इतर शासकीय विभाग, कर सहाय्यक वस्तू व सेवा कर तसेच सरळ सेवा परीक्षा अंतर्गत कोर्सेस मध्ये तलाठी, ग्रामसेवक व कृषी सेवक, पोलीस भरती इतर लिपिक भरती असे अनेक कोर्सेस या करिअर अकॅडमी मध्ये घेतले जाणार असून शारीरिक चाचणी तयारीसाठी व लेखी परीक्षासाठी तज्ञ मार्गदर्शक शिक्षक काम पाहणार असल्याचे चेअरमन मा

#Pune:कसब्यात मविआचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ स्टार प्रचारक आ.शेखर निकम यांचा झंजावात

Image
महादरबार न्यूज नेटवर्क   - विलास गुरव पुणे कसबा विधनासभा पोटनिडणूक २०२३ करिता महाविकासचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचाराकरिता कसबा पेठ येथे स्टार प्रचारक म्हणून वरिष्ठांकडून निवड झालेले चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार यांनी प्रचार दौरा केला तेथील नामदेव शिंपी समाजबांधव बैठकींमध्ये मार्गदर्शन करुन उमेदवार  रविंद्र घंगेकर यांना विजयी प्रचंड मताने विजयी करा असे अवाहन केले. कसबा मतदार संघामध्ये आमदार शेखर निकम यांनी चिपळूण व संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील येथे नोकरीसाठी स्थायिक झालेले ग्रामस्थ व सह्याद्रि शिक्षण संस्थेतील माजी विद्यार्थी यांची भेटी घेऊन त्यांच्या बैठका घेतल्या, त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या, त्यांना महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचाराकरिता मी येथे आलो आहे हे सांगून येथील असलेल्या समस्या यांच्या माध्यमातून सोडवू असे सांगितले. याबाबत विश्वास दिला आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना बहुमताने विजयी करा अशी आपल्या लोकांना मायेची साद घालून अवाहन केले. या हाकेला

#Natepute:छञपती शिवाजी महाराज जागतीक किर्तीचे राजे होते - शिवव्याख्याते विक्रम मगर

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  - छञपती शिवाजी महाराज कोणा एका जातीचे नसून सर्व जातीधर्माला बरोबर घेऊन जाणारे जागतीक किर्तीचे राजे होते असे मत शिवव्याख्याते विक्रम मगर यांनी व्यक्त केले. येथील समस्त ग्रामस्थ नातेपुते,व अखिल भारतीय मराठा महासंघ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.प्रारंभी शिवप्रतिमेचे पुजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले.याप्रसंगी जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी दिपोत्सव साजरा करण्यात आला.         या कार्यक्रमास शिवव्याख्याते विक्रम मगर,नगराध्यक्ष उत्कर्षाराणी पलंगे,उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमूख,मार्केट कमिटी उपसभापती मामासाहेब पांढरे,पंचायत समिती माऊली पाटील,माजी सरपंच अमरशील देशमूख,नगरसेवक अॅड बी.वाय.राऊत,रणजित पांढरे,किशोर पलंगे, रणविर देशमूख,सपोनि प्रविण संपांगे,शरद बापू मोरे,राजाभाऊ देशमूख,डाॅ थोरात, पत्रकार सुनील राऊत,मोहीत जाधव,बाळासाहेब काळे, बशीर काझी,डाॅ.वैभव कवितके,महीला पतसस्थेच्या अध्यक्षा सूचिञादेवी देशमूख,मनिषा जाधव,वैशाली देशमूख  ,जि.प.सदस्या सरोजिनी गरूड, आदि मान्यवर ,बहूसंख्य महीला,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#Malshiras:शासनाच्या आरोग्य सेवा व योजनांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा - डॉ. आप्पासाहेब देशमुख

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ,तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना व पंतप्रधान जन आरोग्य योजना अंतर्गत माळशिरस ग्रामीण रुग्णालयात महाआरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .या शिबिराचे उद्घाटन माळशिरस नगर पंचायतचे नगराध्यक्ष माननीय डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. शासनाने नागरिकांना विविध आरोग्य सेवा मिळण्यासाठी अनेक आरोग्य योजना सुरू केल्या आहेत तरी सर्व नागरिकांनी आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन माळशिरस नगरपंचायत चे नगराध्यक्ष माननीय डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांनी यावेळी केले. शासकीय रुग्णालयात देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा सर्व मोफत आहेत तसेच अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया ही मोफत केल्या जातात .रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे .रक्तदानामुळे अनेकांना जीवदान मिळत असते ,असे प्रतिपादन डॉक्टर देशमुख यांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केले. यावेळी नगरसेवक विजय देशमुख, नगरसेवक जगन्नाथ गेजगे, नगरसेविका रेश्मा ताई टेळे, बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा उपप्रमुख संतोष वाघमोडे ,सुरेश वाघ

#Satara:माणमधील खडकीत एक कोटी रुपयांचा गांजा जप्त

Image
म्हसवड पोलीस व सातारा स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई महादरबार न्यूज नेटवर्क  - एकनाथ वाघमोडे सातारा जिल्ह्यामधील दुष्काळी म्हणून ओळख असणाऱ्या माण तालुक्यातील म्हसवड नजीक खडकी परिसरात तब्बल एक कोटीहून अधिक किमतीच्या ४२२ किलो वजनाची गांजाची झाडे हस्तगत करण्यात म्हसवड पोलीस व सातारा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणात कुंडलिक खांडेकर यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.           खडकी परिसरात मका व डाळिंब बागेत गांजाची लागवड केल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. त्यानुसार सोमवारी (ता.१४) मध्यरात्री उशिरा पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत पाेलिसांनी एकास ताब्यात घेतले. या आधी काही दिवसांपुर्वीच सातारा  जिल्ह्यातील म्हसवड शहरापासुन सुमारे दहा किलेमिटर अंतरावरील पानवण गावातील ऊसाच्या शेतात दडवून ठेवलेला तब्बल १५ लाख रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी धाड टाकून जप्त करण्याची केला होता.            कुडलीक खांडेकर गेल्या तीन- चार वर्षापासून थोड्या फार प्रमाणात शेतातच गांजाची लागवड करीत हाेता. त्यातून त्याला चांगला आर्थिक लाभ आत्ता पर्यंत मिळाला होता. त्यामुळे एवढ्या

#Pune:दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या आगामी ऐतिहासिक चित्रपटात झळकणार अभिनेत्री माधुरी पवार

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  - अमोल राजपूत महाराष्ट्राची अप्सरा अशी ओळख  असलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार हिने आपल्या अदाकारीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. नृत्यबरोबरच 'रानबाजार' वेबसिरीज मधील राजकारणतील एक महत्वाकांक्षी करारी प्रेरणा सयाजीराव पाटील साने ची भूमिका सकारून माधुरी पवार ने आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयाने प्रेक्षक आणि समीक्षकांची दाद मिळवली तसेच छोटया पडद्यावरील 'तुझ्यात जीव रंगला' मधील 'वहिनीसाहेब' व 'देवमाणूस' मधील 'चंदा' या भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.    माधुरी पवारने कोणत्याही एका प्रकारच्या भूमिकेत 'टाईप कास्ट ' न होता आपल्या दमदार अभिनयातून आपली क्षमता सिद्ध करून अभिनयाचे धनुष्य लीलया पेलले आहे आणि त्यामुळेच तिचा प्रेक्षकवर्ग लाखोंच्या घरात आहे. मराठीसह तिने साऊथ इंडस्ट्री मध्येही पदार्पण केले आहे.    आता माधुरी पवार च्या चाहत्यांसाठी महत्वपूर्ण बातमी आमच्या हाती लागली असून माधुरी लेखक, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी बहुचर्चित मराठी,हिंदी सह पाच भाषांम

#Indapur:श्री.लक्ष्मी नृसिंह अध्यात्मिक गुरुकुल मध्ये विद्यार्थी संस्कारक्षम व वारकरी शिक्षणाचे चांगले अध्यायन करतील - श्रीगुरू बापुसाहेब देहुकर महाराज

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  - बाळासाहेब सुतार निरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथील श्री.लक्ष्मी नृसिंह अध्यात्मिक गुरूकुल(प्रतिष्ठान) च्या इमारत बांधकाम भुमीपुजन संत तुकाराम महाराजांचे 9 वे वंशज श्रीगुरू बापुसाहेब देहुकर महाराज यांचे शुभहस्ते करण्यात आले. निरानरसिंहपुर येथे ह.भ.प अंकुश रणखांबे यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मी नृसिंह अध्यात्मिक गुरूकुल मार्फत भक्त प्रल्हाद  संगीत विद्यालय चालू आहे तसेच वारकरी शिक्षण संस्था जुन2023 पासुन चालू करत आहेत.या साठी निरा नरसिंहपुर येथे इमारत बांधकाम भुमीपुजन करण्यात आले. या प्रसंगी वेदपाठ शाळेतील बटु मुलांनी मंत्रघोष व मंत्रजागर केला.श्री.नृसिंह व श्री.विठ्ठल देवतेंच्या प्रतिमा पुजन व समई दीप प्रज्वलन श्री.गुरू बापुसाहेब देहुकर महाराज व देणगीदार ह.भ.प.आनंद काकडे महाराज  तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे सरपंच व ग्रा.प सदस्य,चेअरमन,प्रतिष्ठीत नागरीक,वारकरी व संगमचे नुतन सरपंच श्री.नारायणराव ताटे देशमुख यांचे हस्ते करण्यात आले.संस्थे मार्फत आलेल्या प्रमुख श्री.गुरू बापुसाहेब देहूकर महाराज यांचा कपडे,शाल श्रीफळ,.पुष्पहार देऊन सन्मान केला तसे

#Natepute:नातेपुते येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे - राष्ट्रीय पत्रकार संघटनेची मागणी

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  - नातेपुते सह परिसरातील आजूबाजूच्या ३० ते ३५ गावांसाठी नातेपुते येथे आरोग्याच्या दृष्टीने उपजिल्हा रुग्णालय होणे महत्त्वाचे आहे नातेपुते परिसरातील गावांमध्ये गरीब शेतकरी व मजुरी करणारे गरीब मजूर यांचे प्रमाण जास्त असल्याने नातेपुते येथे खासबाब म्हणून उपजिल्हा  रुग्णालय होण्यासाठी ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंड सर्कल या संघटनेच्या वतीने नातेपुते येथे उपजिल्हा रुग्णालय होण्यासाठी सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा बाळासाहेबांची शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजीराव सावंत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्रीकांत बाविस्कर, तालुकाध्यक्ष अभिमन्यू आठवले, कार्याध्यक्ष विलास भोसले, तालुका उपाध्यक्ष श्रीराम भगत महाराज, सचिव हनुमंत माने, तसेच पत्रकार सचिन रणदिवे, सुनील ढोबळे,अनिल साळूंखे आदी उपस्थित होते.

#Natepte:आजचा सुदृढ बालक म्हणजे उद्याचा बलवान भारत : सोनिया बागडे

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  - आरोग्य बाबतीत शासनाचे उपक्रम  व्यवस्थित  राबवून  मुलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी लहान बालकापासून किशोरवयीन मुला-मुलींकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे कारण आजचे बालक  म्हणजे उद्याचे बलवान भारत ठरणार आहेत किशोरवयीन वय म्हणजे आयुष्याची जडणघडण होणारे वय असते आणि या वयात आहार आणि आरोग्य याकडे लक्ष दिले तर पुढची पिढी सुदृढ होईल आणि भारत देश बलवान होईल म्हणून  १० ते १८ वयोगटातील  किशोरवयीन मुला मुलींची व्यवस्थित आरोग्याची तपासणी झाली पाहिजे  रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे मुला-मुलींनी भविष्यात  मोठे होऊन मनात  निश्चय ठेवावा आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर ठेवून सामाजिक उपक्रम राबवण्याचा मनात निश्चय ठेवला पाहिजे वाढदिवसाला रक्तदान करण्याची संकल्पना करूया राजकुमार हिवरकर पाटील यांना सामाजिक काम करण्याचा ध्यास आहे ते त्यांच्या कामातून दिसत आहे सर्वांना सामील करून ते काम करीत आहेत तसेच इथून पुढे आरोग्याच्या काही अडचणी असतील तर ते दूर केल्या जातील असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

#Natepute:दत्तात्रय रुपनवर यांची महावितरणच्या जिल्हा समन्वयक पदी निवड

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आदेशान्वये तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री राधाकृष्ण विखे पाटील व दमदार आमदार मा.राम सातपुते साहेब यांच्या शिफारशीने , महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई ऊर्जा विभाग द्वारा सोलापूर जिल्हा समन्वयक महावितरण पदी दत्तात्रय ल.रुपनवर( महावितरण, अकलूज विभाग ता.मालशिरस) यांची नियुक्ती झाली आहे. सोलापूर जिल्हा समन्वयक पद महावितरणचे ग्राहक व शेतकऱ्यांचे वीजे संबंधित सर्व प्रश्न मार्गी लावणे बाबत आहे. जिल्हा समन्वयक पदाचा मान पहिल्यांदाच माळशिरस तालुक्याला मिळाला असून त्याबद्दल रुपनवर यांनी तालुक्याचे दमदार आमदार श्री राम सातपुते साहेब यांचे आभार व्यक्त केले.

#Malshiras:माळशिरस येथे राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक पार पडली

Image
माजी कॅबिनेट मंत्री महादेवजी जानकर माळशिरस येथे बोलताना म्हणाले सर्व निवडणूका स्वबळावर लढणार महादरबार न्यूज नेटवर्क  -  ता . माळशिरस मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठकीसाठी माजी कॅबिनेट मंत्री तसेच संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर व प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते तसेच मुख्य महासचिव ज्ञानेश्वरजी सलगर यांच्या उपस्थीतीत बैठक पार पडली . बोलताना आमदार मा. महादेव जानकर साहेब यांनी यापुढील सर्व निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती ,लोकसभा नगरपालिका रासप स्वबळावर लढणार असल्याची घोषणा जानकर साहेबांनी  पदाधिकार्यांना संबोधित केले. तालुक्यातील प्रत्येक गावा गावात जावुन कार्यकता जोडला पाहीजे . जिल्हा परिषद पंचायत समिती गण गट वाहीज भेटीदेवुन सभासद वाढवले पाहीजे राष्ट्रीय समाज पक्षाकडे बगण्याचा दुष्टीकोन चांगला आहे . आपण तिथ पर्यंत पोचले पाहिजे . गाव तिथ शाखा तसेच विविध प्रकारच्या आघाड्या स्थापन करा असे आवाहन करण्यात आले . यावेळी प्रदेशाध्यक्ष  काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव  ज्ञानेश्वर सलगर, जिल्हाध्यक्ष  रणजित सुळ, बाळासाहेब शिंदे , महिला नेत्या कविता माने, जयश्री गावडे ,त

#Malshiras:संजय हुलगे यांची महाराष्ट्र पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याने माजी कॅबिनेट मंत्री महादेवजी जानकर यांच्या हस्ते सन्मान

Image
महादरबार न्यूज नेटवर्क  -  महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर यांनी नुकतीच 2023 ची नूतन कार्यकारणी घोषित केली.महाराष्ट्र पत्रकार संघाच्या पदाधिकारी यांची पहिली यादी गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आली. तसेच दुसरी यादी 1 फेब्रुवारी   रात्री ८ वाजता जाहीर करण्यात आली . यामध्ये माळशिरस तालुक्यातुन पत्रकार क्षेत्रात चांगले काम असलेले संजय दत्तू हुलगे यांना महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद देवुन घोषीत करण्यात आले. माळशिरस मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठकीसाठी माजी कॅबिनेट मंत्री तसेच संस्थापक अध्यक्ष महादेवजी जानकर व प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते तसेच मुख्य महासचिव ज्ञानेश्वरजी सलगर आले असता त्यांनी पत्रकार संजय हुलगे यांची महाराष्ट्र पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्यने त्यांचा सन्मान करण्यात आला . महाराष्ट्र पत्रकार संघाने गेल्या पंधरा वर्षांपासून अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून राज्यात कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे. पत्रकारांसाठी कार्यशाळा, रक्तदान शिबिर कोरोना काळात मदत, व्यक्तिमत्व विकास शिबिर राज्यातील पत्रकारासाठी विविध