Posts

Showing posts from June, 2024

#Thane मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी स्वीकारली

Image
राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान महादरबार न्यूज नेटवर्क -प्रदीप शर्मा दिनांक ३० जुन राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी मावळते मुख्य सचिव डॉ.नितीन करीर यांच्याकडून स्वीकारली. राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मानही सौनिक यांना मिळाला आहे. मावळते मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमास अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, महानगर पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव अनूप कुमार, अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, पर्यटन विभाग प्रधान सचिव जयश्री भोज, प्रधान सचिव आभा शुक्ला, प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्यासह इतर विभागाचे प्रधान सचिव, सचिव आणि वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या, राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये शेतकरी, महिला, बालके, युवक तसेच सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी महत्वाचे ध

#Pune वनाझ परिवार विदया मंदिर शाळेचा ४६ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव   वनाझ परिवार विद्यामंदिर कोथरूड येथील सदैव उपक्रमशील शाळा म्हणून ओळख असलेल्या वनाझ परिवार विद्यामंदिर कोथरूड पुणे या शाळेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी शाळेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावर्षी शाळेचा ४६ वा  वर्धापन दिन साजरा केला.  यावेळी कार्यक्रमाला संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती रजनी दाते, शिक्षण सल्लागार अ. ल. देशमुख, सचिव वाय. के. कदम, खजिनदार विनोद सपकाळ शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अनिताताई दारवटकर व उपमुख्याध्यापिका निताताई जाधव पर्यवेक्षिका सौ माया झावरे, सौ.कांचन गोपाळे उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व शाळेचे संस्थापक खांडेकर सरांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली वर्धापन दिनाचा कार्यक्रम दोन्ही विभागांमध्ये अत्यंत  आनंदात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त शाळेत विद्यार्थी व मान्यवरांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी प्राथमिक विभागामध्ये कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता कांबळे तर उच्च प्राथमिक विभागामध्ये स्वाती  वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे शैक्षणिक सल्लागार अ. ल.देशमुख यांनी विद्या

#Malshiras माळशिरस येथे स्वाभिमानीचे आक्रमक आंदोलन

Image
मका,तेल, दूध भुकटीबाबत केंद्राने काढलेले अध्यादेशाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून होळी महादरबार न्यूज नेटवर्क - केंद्र सरकारने १० हजार टन दुध भुकटी ५ लाख टन मका 3 लाख कच्चे सूर्यफूल आणि रिफाइंड मोहरी तेल आयतीचा अध्यादेश काढला या निर्णयाचा निषेध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने या अध्यादेशाची माळशिरस येथे रविवारी होळी करण्यात आली. केंद्र सरकारने बुधवारी अधिसूचना काढून मका,कच्चे सूर्यफूल रिफाइंड मोहरी तेल,आणि दूध भुकटीची आयात शुल्क शून्य केले आणि १० हजार टन दूध भुकटी ५ लाख टन मका ३ लाख टन कच्चे सूर्यफूल आणि रिफाइंड मोहरी तेल आयातीचा अध्यादेश काढला या अन्यायकारक अध्यादेशाची होळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अजित बोरकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली या  निर्णयाच्या थेट परिणाम दूध मका आणि तेलबियांच्या दरावर होणार आहे. दूध दरासाठी शेतकरी आंदोलन करत असतानाच आयतीमुळे भुकटीचे भाव कमी झाले. या निर्णयामुळे दूध दरात ही तीन ते चार रुपये पर्यंत घट होणार असल्याने दूध उद्योगात तसेच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्य

#Chiplun मठाधीश भाईनाथजी महाराज यांच्याकडून जि.प.धामणी नं.१ येथे शैक्षणिक साहित्य वाटप

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव   धामणी येथे बुधवार दि. १९ जुन रोजी जि.प.आदर्श  केंद्रशाळा धामणी नं.१  ता. संगमेश्वर या ठिकाणी सामाजिक सेवेचा वसा अंगिकारलेले श्री श्री श्री महंत पीरयोगी भाईनाथजी महाराज " मठाधीश कालभैरव मठ खोपोली यांच्या वतीने धामणी गावातील सर्व शाळांमधील गरजू व होतकरू मुलाना शालेय गणवेश, दप्तर, छत्री,वह्या ,पेन,कंपासपेटी इत्यादी शैक्षणिक शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच मुलांच्या स्पर्धा  परीक्षांसाठी महाराजांनी चांगली आर्थिक  तरतूद केली. सदर कार्यक्रमास स्वामीभक्त श्री.प्रभाकर शेठ घाणेकर,  उपसरपंच श्री संगम पवार, ग्रामपंचायत सदस्या सौ. स्वाती सप्रे,प्राजक्ता घाणेकर, सौ प्रेरणा लिंगायत, सौ शर्मिला गुरव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  केंद्र प्रमुख श्री जंगम, मुख्याध्यापक श्री गेल्ये,सर्व शिक्षक, श्री दिगंबर लिंगायत ( वार्ताहर) ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सदर कार्यक्रम उद्योजक श्री प्रभाकर शेठ घाणेकर यांच्या अथक प्रयत्नातून  आणि प्रेरणेतून गेली १५ वर्षे अखंडपणे पार पडत आहे. कार्यक्रमाला स्वतः मठाधीश भाईनाथजी महाराज आण

#Chiplun पक्ष संघटना बळकट करा, विकासकामांची जबाबदारी माझी - आ. शेखर निकम

Image
कुटरे येथील राजेंद्र मोलक यांच्यासह कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशावेळी आश्वासन महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव आमदार शेखर निकम यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन कोकरे जिल्हा परिषद गटातील कुटरे माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र मोलक आणि कुटरे माजी सरपंच सुवर्णा मोलक यांच्यासह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी आमदार शेखर निकम यांनी प्रवेशकर्त्यांचे जंगी स्वागत केले. ️   आमदार शेखर निकम यांचे अगोदरपासून गावागावात विकास करण्याचे ध्येय होते आणि त्या सानिध्यातून त्याचे समाजकार्य चालूच होते. मात्र आमदार होण्याची संधी त्यांना जनतेच्या माध्यमातून मिळाली. जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि आमदार झाल्यापासून त्यांनी प्रत्येक गावात नियोजनबद्ध असा विविध विकास कामाचा झपाटा लावला. त्यातून त्यांनी जनतेच्या मनात एक वेगळीच भूरळ पाडली व जनतेमध्ये छाप पाडली. कला, क्रीडा, पर्यटन, शिक्षण, उद्योग व ग्रामिण भागातील विविध विकास कामे करत तसेच बरेचशे प्रलंबीत प्रश्न अधिवेशनामध्ये मांडून जनतेला न्याय मिळवून दिला.     ️ कार

#Yavat केडगाव येथील सनराईजचे ९० विद्यार्थी अबॅकस स्पर्धेत अव्वल

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट, पुणे येथे नुकत्याच अबॅकस उन्हाळी स्पर्धा पार पडल्या. यामध्ये पुणे, अहमदनगर व सातारा या जिल्ह्यातील १०७४ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यामध्ये केडगाव व खूटबाव येथील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. केडगाव येथील सनराईज अबॅकसच्या तब्बल ९० विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले . मॅन ऑफ द मॅच म्हणजेच त्या दिवसाचे सर्वोत्कृष्ट कमी वेळात १०० गणिते सोडवणारी म्हणून मॅथस मॅजिशियन पुरस्काराने आरती अमोल थोरात या विद्यार्थिनीला सन्मानित करण्यात आले. तिने ३ मिनिट ५ सेकंदात १०० अचूक गणिते सोडवून विक्रम नोंदविला.  यावेळी सनराईजला महाराष्ट्रातील सर्वात जास्त एनरोलमेंट करणारे सेंटर व जिल्ह्यातील 'बेस्ट सेंटर' म्हणुन सन्मानीत करण्यात आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना केंद्र चालक कल्पना नवले, आकांक्षा सरतापे, मोहित कुंभार, भाग्यश्री हंडाळ, श्रद्धा टकले, शितल कुऱ्हाडे यांचे मार्गदर्शन लाभले. या परीक्षेत वयोगट व लेव्हल नुसार प्रथम क्रमांक पटकावकेले विदयार्थी: वेदांत सोडनवर, राजवीर दळवी,गार्गी

#Pune किरण शेलार महाराष्ट्र रत्न पुरस्काराने सन्मानित

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - मुंबई येथील रुद्रांश फौंडेशन मल्टिपर्पज सोसायटी व सिनेअर्क प्रॉडक्शन यांच्यावतीने कारूंडे (बंगला)   ता. माळशिरस जि. सोलापूर येथील किरण हिरालाल शेलार यांना यावर्षीचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२४ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.      मुंबई येथील रुद्रांश फौंडेशन व सिनेअर्क प्रॉडक्शन यांच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक,शैक्षणिक साहित्य,पत्रकारिता तसेच विविध क्षेत्रात बहुमूल्य कामगिरी व योगदान असलेल्या मान्यवरांचा पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२४ या दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी आयुर्वेदाचार्य किरण हिरालाल शेलार यांना पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोहोळ यांच्या शुभहस्ते व पुणे महानगरपालिकेचे उपआयुक्त युनुस पठाण, इंक्रेडिबल सोशल वर्कर्स ग्रुपचे अध्यक्ष अस्लम बागवान,ज्येष्ठ लेखिका सौ शैलेजाताई मोहोळ, निसार फोंडेशनचे अध्यक्ष हाफिज शेख व रुद्रान्स फौंडेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर विनोद खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२४ या पुरस्काराने स्मृतीचिन्ह व

#Pune वनाझ परिवार विद्या मंदिर कोथरूड पुणे येथील शाळेचा पहिला दिवस अत्यंत उत्साहात साजरा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव पुणे येथील  वनाझ परिवार विद्यामंदिर कोथरूड शाळेत विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी औक्षण करून उत्साहाने स्वागत करण्यात आले व नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांना आकर्षक  भेटवस्तू देण्यात आल्या. शाळेचा पहिला दिवस मनोरंजक व्हावा यासाठी विद्यार्थ्यांसोबत गप्पा गाणी गोष्टी घेण्यात आले. शाळा व शिक्षक तसेच नवीन पुस्तके पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. तसेच शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी आकर्षण म्हणून डोरेमॉन आणला होता. डोरेमॉनने विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच खास आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉईंट ठेवण्यात आला होता. या दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे फोटो काढून वर्गाच्या ग्रुप वरती पालकांना पाठवण्यात आले. विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी शाळा बघून आनंद व्हावा. म्हणून शाळेमध्ये कार्टून,फुगे, वेगवेगळी चित्रे लावून सजावट करण्यात आली.तसेच बालगीतांच्या स्वरांनी शाळेचा परिसर आनंदमय झाला. अशा प्रकारे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. तसेच इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वह्या व पेन्सिल यांचे वाटप केले तसेच  भ

#Baramati चंदूकाका सराफ अँड सन्स मध्ये पितृ दिन साजरा

Image
सामाजिक बांधीलकी जोपासत विविध क्षेत्रातील पिता पुत्राचा सत्कार महादरबार न्यूज नेटवर्क - आई वात्सल्य चे प्रतीक तर वडील कुटूंबाचा आधार व जिथे विषय गंभीर त्या ठिकाणी वडिल खंबीर असतात हे प्रत्येक वेळी वडील,बाबा,पिता, बाप ही नावे दाखवून देतात त्यामुळे त्यांचे ऋण विसरू नये. व्यवसाय करताना सामाजिक भान ठेवून, संस्कृती ची जोपासना होणे साठी व संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी व वडीलाच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी चंदू काका सराफ अँड सन्स यांच्या वतीने रविवार १६ जून २०२४ रोजी बारामती एमआयडीसी शाखा येथे जागतिक पितृ दिन (फादर्स डे) साजरा करण्यात आला. या प्रसंगी विविध क्षेत्रातील पिता-पुत्र यांना आमंत्रित करण्यात आले होते अभिनय :  राहुल जगताप ढाकळकर व रुद्र प्रताप जगताप ढाकळकर-रणवीर जगताप ढाकळकर . उद्योगक्षेत्र : राजेश जाधव- मुलगी सौ सृष्टी कांडगे व्यवसाय :संदीप दुरुगरकर- कु .गौरी दुरुगरकर, शिक्षण: सतीश भोसले-हर्षल भोसले,खेळ अनिल सावळे पाटील, आर्यमॅन ओम सावळेपाटील.पारंपरिक पद्धतीने पित्याचे  चरण पूजन करून सन्मान मुलांनी व मुलींनी केला. या वेळी  प्रसिद्ध ज्योतिषचार्य श्री विजय कुलकर्णी य

#Malshiras बचेरीचे सुपूत्र अजय लक्ष्मण गोरड यांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - प्रमोद भैस  माळशिरस तालुक्यातील बचेरी गावचे सुपुत्र  अजय लक्ष्मण गोरड यांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे. बचेरी सारख्या दुष्काळी  गावातुन प्रतिकुल परिस्थिती असताना  त्यांनी या पदाला गवसणी घातली.२००४  मध्ये  १८ व्या वर्षी अकोला येथे पोलीस  दलात शिपाई  म्हणून  भरती झाले  पोलीस दलात नोकरी करत असताना  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातुन पदवीचे शिक्षण पूर्ण केले व २०१०  मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले .अकोला येथे अडीच वर्षे सेवा केली त्यांतर सहहयाक पोलीस निरीक्षक  म्हणून  पुणे ,ग्रामीण येथे व नंतर सातारा व अहमदनगर येथे सेवा बजावली. पोलीस दलात नोकरी करीत असताना  अतिशय  उल्लेखनिय व प्रशंसनीय कामगिरी केल्याबद्दल अजय गोरड यांना  केंद्र सरकारचे आंतरिक सुरक्षा पदक,महाराष्ट्र शासनाचे खडतर सेवा पदक तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील महाराष्ट्रातील  सर्वोच्च पदक पोलीस महासंचालक पदक २०२२  मध्ये मिळाले . त्यांचे प्राथमिक शिक्षण जि परिषद प्राथमिक बचेरी,पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण जवाहरलाल शेतकी विदयालय पिलीव, अकरावी ,बारावीचे शिक्षण आटपाडी य

#Yavat बाल शास्त्रज्ञ आर्यन राऊत याने बनवली घरी ई- सायकल

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दौंड तालुक्यातील लहानश्या १३ वर्षाच्या  आर्यन विजय राऊत ( केडगाव)   याने उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये टाकाऊ वस्तु पासून घरच्या घरी इलेक्ट्रिक सायकल बनवली.२० ते २५ किमी एकाच वेळी चार्जिंग केल्यानंतर  सायकल जाते. शालेय विद्यार्थ्यांसाठी या बाईकचा उपयोग होऊ शकतो असे  आर्यनने  सांगितले. आर्यनचे वडील कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये अभियंता आहेत. तर आजोबा शेतकरी आहेत. आर्यनने ई-सायकल बनवण्याची संकल्पना आपले आजोबा विठोबा राऊत यांच्याकडे मांडली. आजोबांनी त्यास संमती देत त्याला लागणाऱ्या वस्तू पुरवल्या. आजोबा व नातवाचे घरच्या घरीच प्रयोग सुरू झाले. सर्वप्रथम त्याने घरी बंद अवस्थेत असलेली जुनी सायकल घेतली. तिला सूस्थितीत चालू केली. त्यानंतर लॅपटॉपच्या जुन्या बॅटरीतील सेल वापरून त्याला चार्जेबल करण्याच्या विचारात होता. मात्र वडिलांनी यूपीएस मधून शिल्लक राहणाऱ्या दोन बॅटऱ्या त्याला प्रयोग करण्यासाठी दिल्या. त्या सायकलचे कंट्रोलर व मोटर व्यवस्थित ठेवण्यासाठी एका प्लास्टिकच्या बॉक्समध्ये त्याला ठेवायला सांगितले. सायकलच्या बरोबर मध्यभागी बॉक्स बॅलन्ससाठी ठेवले

#Mumbai आमचं सरकार वारकऱ्यांचे सरकार - मुख्यमंत्री श्रीएकनाथजी शिंदे साहेब

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव  आषाढी वारीच्या पूर्व नियोजनाबाबत शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथी गृह येथे बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत ( VC द्वारे ) उपस्थित होते. वारकरी संप्रदायांतील सर्व पालखी,  विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती अध्यक्ष व सदस्य, संत समाधी संस्थान प्रमुख, संत वंशज, वारकरी फडकरी दिंडी संघटना व प्रमुख वारकरी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.  बैठकीस उपस्थित असणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला मुख्यमंत्री सन्मानाने आदराने भेटले. मुख्यमंत्री शिंदे साहेब म्हणाले की, आषाढी वारीसाठी गतवर्षी पंढरपुरात भेट देऊन, पाहणी करून तयारी केली होती. यंदाही चांगले नियोजन करून, आषाढ वारी स्वच्छ, निर्मल आणि सुरक्षित व्हावी यासाठी शासनाच्या सर्वच विभागांनी चांगली तयारी केली आहे. विशेषतः अपघात टाळण्यासाठी गृह विभागाला नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. हे सरकार सर्व सामान्यांचे आहे. शेतकऱ्यांचे, व

#Natepute तहसील कार्यालय व कारूंडे ग्रामपंचायत यांच्या वतीने शैक्षणिक दाखल्यांचे शिबिर

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - तहसील कार्यालय माळशिरस व कारूंडे  ग्रामपंचायत यांच्या वतीने १४ जून २०२४ रोजी कारूंडे येथे विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक दाखल्यांचे  शिबिराचे आयोजन केले आहे. सध्या दहावी बारावी विद्यार्थ्यांचे शाळेचे निकाल लागले असून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी विविध शासकीय शैक्षणिक दाखले मिळण्यासाठी अडचण होऊ नये याचा विचार करून तहसील कार्यालय माळशिरस व ग्रामपंचायत कारूंडे यांनी विविध शैक्षणिक दाखले वेळेत व लवकर मिळावेत यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारूंडे या ठिकाणी शिबिराचे आयोजन केले आहे. शालेय विद्यार्थ्यांना शालेय दाखले  त्वरित वितरित करण्यात येणार आहेत. तरी कोथळे, पिंपरी, मोरोची, धर्मपुरी व कारूंडे येथे विद्यार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह उद्या सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारूंडे येथे उपस्थित रहावे व सदरील शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन तलाठी, मंडल अधिकारी व कारूंडे ग्रामपंचायत यांच्यावतीने करण्यात आले आहे.

#Yavat जागतिक पर्यावरण दिना निमित्त सिध्दबेटात वृक्षारोपण

Image
सिध्दबेटात माऊली मंदिरातील पुरातन सुवर्ण पिंपळ वृक्षाचे बीज वृक्षारोपण महादरबार न्यूज नेटवर्क -  संतोष जगताप जागतिक पर्यावरण दिना निमित्त आळंदी येथील संत लीलाभूमी आळंदी सिद्धबेट येथे आळंदी नगरपरिषद, आळंदी जनहित फाऊंडेशन, सार्वजनिक वनीकरण विभाग, वन विभाग यांचे माध्यमातून विविध सेवाभावी व्यक्ती, पर्यावरण प्रेमी संस्था यांचे माध्यमातून ५५ देशी वृक्षांचे वृक्षारोपणा संयोजक अर्जुन मेदनकर यांचे हस्ते करण्यात आले. आळंदी माऊली मंदिरातील वैभवी पुरातन सुवर्ण पिंपळ वृक्षाचे बीज संकलन केलेल्या बियांपासून तयार करण्यात आलेल्या सुवर्ण पिंपळ रोपे वृक्षांचे आळंदी सिध्दबेटात वृक्षारोपण करण्यात आले.   जागतिक पर्यावरण दिनी सामाजिक बांधिलकीतून वनपरिक्षेत्र अधिकारी खेड सार्वजनिक वनीकरण विभाग अनिल लांडगे, आळंदी जनहित फाउंडेशन यांचे मार्गदर्शनात उपक्रम राबविण्यात आला. या प्रसंगी सा. वनी खेड वनपाल गुलाब मुके, वनरक्षक सा. वनी खेड सोपान अनासुने, वनसेवक बाळासाहेब कोहीणकर, दत्ता कारले, संयोजक आळंदी शहर पर्यावरण संवर्धन समिती अध्यक्ष अर्जुन मेदनकर, नेचर फाउंडेशन अध्यक्ष भागवत काटकर, पोलीस मित्र वे

#Baramati चंदुकाका सराफ प्रा लि यांचे वतीने पर्यावरण दिन वृक्षारोपनाने साजरा

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - शुद्ध सोन्यासाठी प्रसिद्ध असलेली बारामतीची सुवर्णपेढी चंदुकाका सराफ प्रा लि च्या बारामती व एमआयडीसी शाखांनी वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. दोनशे वर्षाकडे वाटचाल करत असलेल्या या सुवर्णपेढीला फक्त व्यवसाय म्हणून नव्हे तर सामाजिक भान देखील जपण्याची शिस्त या सुवर्णपेढीचे चेअरमन  श्री किशोरकुमार शहा यांनी जपली आहे. वेगवेगळे उपक्रम या सुवर्णपेढीच्या माध्यमातून नेहमीच राबवले जातात.महिलांसाठी अनेक कार्यक्रम देखील या सुवर्णपेढीच्या संचालिका सौ नेहा किशोरकुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली होत असतात.   ऑक्सिजनची किंमत अनेकांना कितीतरी पटीने कोरोनाच्या काळामध्ये द्यावी लागली. वृक्ष लागवड करून पृथ्वीवरचे तापमान आपण  नियंत्रित करू शकतो,सध्या ती काळाची गरज बनली आहे. हीच गरज लक्षात घेऊन श्री वाघेश्वरी विद्यालय निरावागज व श्री छत्रपती हायस्कूल व जुनियर कॉलेज भवानीनगर या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी निरावागज येथे अहिल्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व पुणे जिल्हा परिषद पुणे चे माजी अध्यक्ष श्री संपतराव रंगनाथ देवकाते, एडवोकेट धनंजय देवक

#Shikhar shinganapurगुप्तलिंग येथे वानरांना केले केळांचे वाटप

Image
दादासाहेब हुलगे यांनी सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला वाढदिवस महादरबार न्यूज नेटवर्क - गूप्तलिंग व शिखर शिंगणापूर येथील वानरांची अन्नपाण्याविना उपासमार ही परस्थिती  लक्षात घेऊन माळशिरस येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब हूलगे यांनी वानरांची अन्नाची गरज भागवली.          शिखर शिंगणापूर व गुप्तलिंग परिसरात वानरांचे वास्तव्य अनेक वर्षांचे आहे पण सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे परिसरातील फळ झाडांचे प्रमाण घटले आहे त्याचबरोबर पाण्याचे साठेही आटले आहेत त्यामुळे शिखर शिंगणापूर व माळशिरस तालूक्यातील  गुप्तलिंग येथील वानरांचे अन्न आणि पाणी यांच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात उपासमार होत आहे त्यामुळे वानरांचे पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधात स्थलांतर होत ही भीषण दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब हुलगे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुप्तलिंग परिसरातील वानरांना केळांचे वाटप केले . त्यावेळी निलेश हुलगे,जगन्नाथ हुलगे,नवनाथ हुलगे,रणजित गोरड आदी जण उपस्थित होते.हा सामाजिक उपक्रम जरी छोटा असला तरी त्यामागील उद्देश समाजातील दानश

#Baramati चंदुकाका सराफ प्रा लि मध्ये दिव्य रत्न महोत्सवास सुरुवात

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - 198 वर्षाची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या व मूळ बारामतीची असणारी सुवर्णपेढी चंदुकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड या सुवर्णपेढीमध्ये नवरत्न महोत्सवास सुरुवात झालेली आहे. पाचू, माणिक, पोवळा, लसण्या, पुष्कराज, मोती,हिरा, गोमेद व निलम अशी नऊ रत्ने असून सदरील राशीनुसार उपलब्ध होत असलेल्या रत्नांवर 10%  इतका डिस्काउंट सध्या उपलब्ध असून सर्व सन्माननीय ग्राहकांनी याचा जरूर लाभ घ्यावा असे आवाहन चंदुकाका सराफ प्रा लि चे चेअरमन श्री किशोरकुमार शहा यांनी केले.  ही नवरत्न माणसाचे सौंदर्य खुलवतात त्याचबरोबर भाग्य उजळण्यासाठी तितकेच मोलाचे देखील ठरतात. प्रकृतीच्या नियमानुसार सदरील रत्नांना अनमोल महत्त्व असल्याचे मत चंदुकाका सराफ प्रा. लि.चे सेल्स हेड श्री दीपक वाबळे यांनी व्यक्त केले. बारामती व एमआयडीसी शाखेमध्ये बारामती व परिसरातील प्रसिद्ध ज्योतिषी, वास्तु विशारद व शुभ कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या शुभहस्ते दिव्यरत्न महोत्सवाचे  उद्घाटन करण्यात आले.

#Baramati चंदुकाका सराफ प्रा लि मध्ये दिव्य रत्न महोत्सवास सुरुवात

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - 198 वर्षाची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या व मूळ बारामतीची असणारी सुवर्णपेढी चंदुकाका सराफ प्रायव्हेट लिमिटेड या सुवर्णपेढीमध्ये नवरत्न महोत्सवास सुरुवात झालेली आहे. पाचू, माणिक, पोवळा, लसण्या, पुष्कराज, मोती,हिरा, गोमेद व निलम अशी नऊ रत्ने असून सदरील राशीनुसार उपलब्ध होत असलेल्या रत्नांवर 10%  इतका डिस्काउंट सध्या उपलब्ध असून सर्व सन्माननीय ग्राहकांनी याचा जरूर लाभ घ्यावा असे आवाहन चंदुकाका सराफ प्रा लि चे चेअरमन श्री किशोरकुमार शहा यांनी केले.  ही नवरत्न माणसाचे सौंदर्य खुलवतात त्याचबरोबर भाग्य उजळण्यासाठी तितकेच मोलाचे देखील ठरतात. प्रकृतीच्या नियमानुसार सदरील रत्नांना अनमोल महत्त्व असल्याचे मत चंदुकाका सराफ प्रा. लि.चे सेल्स हेड श्री दीपक वाबळे यांनी व्यक्त केले. बारामती व एमआयडीसी शाखेमध्ये बारामती व परिसरातील प्रसिद्ध ज्योतिषी, वास्तु विशारद व शुभ कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या शुभहस्ते दिव्यरत्न महोत्सवाचे  उद्घाटन करण्यात आले.

#Pune पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे समाजातील योगदान आणि पुरोगामी शासन आजही लोकांसाठी प्रेरणादायी - आ. शेखर निकम

Image
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव पुणे येथे अहिल्यादेवी होळकर समाज सेवा संघ, येरवडा, पुणे यांच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जयंती चिपळूण सगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखरजी निकम यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी झाली. मधुर होती जिची वाणी, अशी जन्मली तत्वज्ञानी राणी गाजवल्या जिने दिशा-दाही, तिच्या उत्तुंग कार्याला खरच सीमा नाही. सुखात नांदली आमची जनता, कारण उत्तम शासन, तत्वज्ञानी राणी होती अहिल्या राजमाता. आमदार शेखर निकम यांनी अहिल्या राजमाता यांच्या विषयी बोलताना सांगितले की, अहिल्यादेवी होळकर यांनी महिला सक्षमीकरण आणि समाज कल्याणासाठी काम केले. त्यांनी महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण आणि शिक्षणासाठी केंद्रे स्थापन केली, त्यांच्या विविध क्षेत्रातील सहभागाला प्रोत्साहन दिले, विधवांची स्थिती सुधारण्यात मदत केली, धार्मिक सहिष्णुता वाढवण्यात योगदान दिले आणि विविध समुदायांमध्ये एकोपा वाढवणे हा नेहमीच त्यांचा प्रयत्न होता. अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्ती होत्या. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधा

#Yavat वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करणे हीच पुण्यश्लोक अहिल्यादेवींना खरी आदरांजली ठरेल – रुपनवर

Image
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त ७९९ वृक्षांचे महावृक्षदान महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप दौंड तालुक्यातील माणकोबावाडी यवत या ठिकाणी आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती व नाथदेवराई फाउंडेशन वर्धापन दिनाचे औचित्य साधत नाथदेवराई फाउंडेशन व माणकोबावाडी ग्रामस्थांनी पिंपळ वृक्षाला फाउंडेशन चा अध्यक्ष घोषित करून ७९९ देशी वृक्षांचे वाटप करत हा महावृक्षदान सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी प्रमुख पाहुणे महेश रूपनवर आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्या हस्ते अहिल्यादेवी च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. तसेच नाथदेवराई फाउंडेशन यांनी पिंपळ वृक्षाला अध्यक्ष म्हणून स्थान दिल्याने द इकोफॅक्टरी फाउंडेशन चे प्रतिनिधी शुभम ठोंबरे व यवत ग्रामपंचायत सरपंच समिर दोरगे यांच्या हस्ते वृक्षपूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशन सदस्य राहुल बिचकुले यांनी केले. त्यांनी फाउंडेशन कार्याचा आढावा मांडत भविष्यातील फाउंडेशन वाटचालीविषयी माहिती दिली. तसेच प्रमुख पाहुणे महेश रूपनवर आत्माचे तंत्रज्ञान व्य